पुणे

वळसे पाटील कुटुंबात तिसऱ्यांदा संधी

CD

मंचर, ता. १८ : पुणे जिल्हा परिषदेत अध्यक्ष व उपाध्यक्षपदांच्या निवडीत यंदा मोठी चुरस असतानाही आंबेगाव तालुक्याला पुन्हा एकदा मानाचे स्थान मिळाले. विवेक वळसे पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे वळसे पाटील कुटुंबाची जिल्हा परिषदेत नेतृत्व करण्याची तिसऱ्यांदा संधी मिळाली आहे.
आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत माजी आमदार दत्तात्रेय गोविंदराव वळसे पाटील यांची ४७ वर्षांपूर्वी (सन १९७९) पुणे जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीच्या सभापतिपदी निवड झाली होती. त्यांचे नातू असलेल्या विवेक प्रतापराव वळसे पाटील यांना जिल्हा परिषद उपाध्यक्षपदाची दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे.
यंदाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीत अनेक दिग्गज नेत्यांनी आपल्या मतदारसंघाला प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. मात्र, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या राजकीय रणनीतीमुळे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पाठबळामुळे आंबेगाव तालुक्याला पुन्हा झुकते माप मिळाले. त्यामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार व दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याप्रमाणेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचेही आंबेगाववरील प्रेम अधोरेखित झाले.

आंबेगावातील आतापर्यंतचे
जिल्हा परिषद पदाधिकारी
- दत्तात्रेय वळसे पाटील यांनी (सन १९७९ ते सन १९८१) अर्थ व बांधकाम समितीचे सभापती म्हणून काम पाहिले.
- सुभाष मोरमारे यांनी (सन १९९२-१९९७ मध्ये समाजकल्याण सभापतिपद भूषविले.
- शैलजा ढोबळे (सन १९९८-१९९९) यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदी संधी मिळाली.
- अरुण गिरे (सन २००७-२००९) यांनी उपाध्यक्षपद सांभाळले.
- विवेक वळसे पाटील यांची दुसऱ्यांदा उपाध्यक्षपदी निवड.

दत्तात्रेय वळसे पाटील,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रातील विद्यापीठांवर राज्यपालांची कडक नजर! त्रैमासिक अहवाल सादर करणे अनिवार्य; प्रशासनाला नवा धक्का

R Ashwin ने कसोटीतून निवृत्तीसाठी गौतम गंभीरला ठरवले जबाबदार? पर्थ कसोटीत काय घडले ते सांगितले... मन मोकळे केले...

Latest Marathi News Live Update :एलपीजीची परिस्थिती अजूनही चिंताजनक: सरकार

"साडी चुरगळू नये म्हणून ती.." प्रसिद्ध डिझायनरचा ऐश्वर्याविषयी धक्कादायक खुलासा; म्हणाला..

Gudipadwa: गुढीपाडव्याला घरपोच पुरणपोळी! महापालिकेचा उपक्रम; ऑर्डर करण्याची प्रक्रिया काय?

SCROLL FOR NEXT