पुणे

सोनल भालेराव यांना रजत पदक

CD

मंचर, ता. २७ : वनसंरक्षण आणि वन्यजीव संवर्धन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मंचर वनपरिक्षेत्रातील वनपाल सोनल भालेराव यांना सन २०२४-२५ या वर्षाचे राज्य शासनाचे रजत पदक जाहीर झाले आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीची दखल घेत हा गौरव करण्यात आला. भालेराव यांनी धामणी आणि कळंब वनपरिमंडळात ७० हेक्टरवर यशस्वी वृक्षारोपण व चार लाख रोपांची निर्मिती केली. जलमृदासंधारणासह बिबट्यांचे रेस्क्यू आणि ‘री-युनियन’ मोहिमा त्यांनी यशस्वीपणे राबवल्या. काठापूर येथील २२ हेक्टरवरील अतिक्रमण हटवून वनक्षेत्र सुरक्षित करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. गेल्या २० वर्षांपासून कार्यरत असलेल्या भालेराव यांनी लोकसहभागातून वनराई बंधारे आणि मानव-बिबट संघर्ष कमी करण्यासाठी जनजागृती केली.

15524

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Revenue Court: महसूल न्यायालयाचे कामकाज मराठीतून, नवी 'एसओपी' लागू; प्रकरणांचा झटपट निपटारा होणार!

Nashik Drowning: ३ मुलं डोळ्यासमोर गटांगळ्या खायला लागली, आईने वाचवायला उडी मारली; बुडून चौघांचाही मृत्यू..

Mobile Recharge Hike : लवकरच मोबाईल रिचार्ज महाग होण्याची शक्यता, पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर दुसरा मोठा धक्का

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

मी सागरची गर्लफ्रेंड, हळदीच्या कार्यक्रमात राडा; ८ लाखांचा खर्च, लग्न मोडताच वधुची पोलिसात धाव, नवरदेवाला अटक

SCROLL FOR NEXT