पुणे

मंचर-अवसरी मार्गावर अंधाराचे साम्राज्य

CD

मंचर, ता. ३ : मंचर ते अवसरी खुर्दचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय या मार्गावर मंचर नगरपंचायतीच्या वतीने बसविण्यात आलेले ४० पथदिवे गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहेत. परिणामी, रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करताना विद्यार्थ्यांना तसेच अवसरी खुर्द, पिंपळगाव परिसरातील नागरिकांना जीव मुठीत धरून जावे लागते.
या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उसाची शेती अन् दाट झाडी असल्याने बिबटे, कोल्हे व लांडगे यांचा वावर कायम असतो. पूर्वी पथदिवे सुरू असल्याने हा परिसर नागरिकांना सुरक्षित वाटत होता. मात्र, दिवे बंद पडल्याने अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले असून भीतीचे वातावरण आहे.
विद्यार्थी अन् पालकांची गैरसोय
अवसरी खुर्द येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात देशभरातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. तसेच, त्यांना भेटण्यासाठी अनेक पालक रात्री ये-जा करतात. काही वेळा मंचरवरून वाहनांची सोय नसल्याने पालकांना पायी प्रवास करावा लागतो. अशा परिस्थितीत बंद पथदिव्यांमुळे अपघात व वन्यप्राण्यांच्या हल्ल्याचा धोका वाढला आहे. नगरपंचायतीने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन ते दुरुस्त करावेत, अशी मागणी विद्यार्थ्यांसह स्थानिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Candidate: नवनीत राणा, छगन भुजबळ चर्चेत; पण राज्यसभेसाठी राष्ट्रवादीचा वेगळाच मास्टरस्ट्रोक! अखेर नाव जाहीर, कुणाला दिली संधी?

Raigad Traffic: पालीकरांना मोठा दिलासा! शहरात अवजड वाहतुकीला सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय..

World Yogasana Championships: भारताचे निर्विवाद वर्चस्व! तब्बल २२ सुवर्णपदकांसह यजमान संघाचे अव्वल स्थान कायम

Video: Shreyas Iyer ची भारताच्या टी२० संघाचा कर्णधार बनल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर; म्हणाला, 'ही भावना खूपच...'

अयोध्येतील राममंदिराच्या तिजोरीवर डल्ला, कोट्यवधींची रक्कम गायब; अखिलेश यादवांच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT