पुणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने जिल्ह्यातील विविध भागांत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमातून औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि तांत्रिक विद्यालयांतील प्रशिक्षणार्थींसह सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. जिल्ह्यातील पाच महत्त्वाच्या ठिकाणी हे मेळावे आयोजित केले आहेत. सोमवार (ता. २०) रोजी वरवंड, मंगळवार (ता. २१) रोजी इंदापूर, बुधवार (ता. २२) रोजी औंध, गुरुवार (ता. २३) रोजी राजगुरुनगर आणि सोमवार (ता. २७) रोजी शिरूर येथील शासकीय आयटीआयमध्ये मुलाखती होतील.
या प्रक्रियेत फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्स, युनो मिंडा आणि ॲडको इंडिया यांसारख्या नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा तसेच पदवीधर व पदव्युत्तर पात्रताधारक उमेदवारांसाठी विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी नोंदणीसाठी ‘www.rojgar.mahaswayam.gov.in’ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उमेदवारांनी शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रती आणि किमान पाच बायोडाटा सोबत आणणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी पुण्यातील रास्ता पेठ येथील कार्यालयाशी किंवा दूरध्वनी क्रमांक (०२०) २६१३३६०६ वर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. सुशिक्षित तरुणांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन आपला विकास साधावा, असे प्रशासनाकडून स्पष्ट केले आहे. या मेळाव्यांमुळे तरुणांसाठी अनेक नोकरीच्या नव्या संधी खुल्या होतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.