मंचर, ता. २४ : आंबेगाव- शिरूर मतदारसंघातील विविध प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुंबई येथे गुरुवारी (ता. २३) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यात सिंचन, पाणीपुरवठा, धरण सुरक्षा आणि तीर्थक्षेत्र विकासाशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
हुतात्मा बाबू गेनू सागरातील (डिंभे धरण) गळती रोखण्यासाठी १७१.५९ कोटींचा प्रस्ताव तांत्रिक समितीकडून मंजूर आहे. या कामांना तातडीने प्रशासकीय मान्यता देऊन अंमलबजावणी सुरू करावी, आगामी सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेता भीमाशंकर परिसरात अखंडित वीजपुरवठ्यासाठी डिंभे येथे ३३/११ के.व्ही. उपकेंद्र उभारण्याच्या प्रस्तावानुसार आवश्यक जमीन हस्तांतरणास मंत्रिमंडळाची मंजुरी द्यावी, वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन मंचर शहरासाठी १३३.५१ कोटी रुपयांच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेला ‘नगरोत्थान महाअभियान’अंतर्गत तत्काळ मंजुरी द्यावी, धामणी परिसरातील शेतकऱ्यांनी लोकसहभागातून पूर्ण केलेल्या ९ उपसा सिंचन योजनांना अद्याप वीजपुरवठा मिळालेला नसल्याने सुमारे १२०० एकर क्षेत्र ओलिताखाली येण्यास अडथळा निर्माण झाला आहे. या योजनांना तातडीने वीज जोडणी द्यावी, कळमजाई, बोरघर व फुलवडे येथे ३ नवीन उपसा सिंचन योजनांसाठी सविस्तर अंदाजपत्रक तयार करून प्रशासकीय मान्यता द्यावी, याबाबत यावेळी सकारात्मक चर्चा झाली. त्यात मुख्यमंत्र्यांनी ३०५ कोटी रुपये खर्चाच्या सर्व मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेत लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.