पुणे

अवसरी खुर्द परिसरात बिबट्याची दहशत

CD

मंचर, ता.२७ : आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द-कौलीमळा परिसरात मंचर वनपरिक्षेत्र कार्यालयाने लावलेल्या पिंजऱ्यात रविवारी (ता. २६) रात्री एक वर्षाचा बिबट्या जेरबंद झाला. जानेवारी महिन्यात याच ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला होता. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात सहा बिबट्यांचा वावर सीसीटीव्हीमध्ये आढळत होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
कौलीमळा येथील शेतकरी सुलोचना वाळके यांच्या घराशेजारी गेल्या साडेचार महिन्यांत तब्बल सहा वेळा बिबट्यांचा वावर सीसीटीव्हीत कैद झाला आहे. २२ फेब्रुवारीला मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या घराच्या आवारात, अंगण व पायरीपर्यंत येऊन गेला होता. त्यानंतर २४ मार्चला दोन बिबटे रात्री साडेनऊच्या सुमारास परिसरात दिसले होते. तसेच पहाटेच्या सुमारास ते घराशेजारून जातानाही कॅमेऱ्यात दिसले. या पार्श्वभूमीवर वन विभागाने पुन्हा पिंजरा लावला होता. अखेर रविवारी रात्री दुसरा बिबट्या जेरबंद झाला. स्थानिक नागरिकांनीही पिंजरा टेम्पोमध्ये चढवण्यासाठी मदत केली.

अवसरी खुर्द परिसरातील नागरिकांनी रात्रीच्या वेळी सतर्क राहावे. घराबाहेर पडताना बॅटरी, काठी किंवा घुंगरू लावलेली काठी सोबत ठेवावी. बिबट्याची चाहूल लागताच घाबरून न जाता तत्काळ वन विभागाशी संपर्क साधावा. वनखात्याच्या कर्मचारी वर्गाकडून रात्री या भागात गस्त सुरू केली आहे.
- विकास भोसले, वनपरिक्षेत्र अधिकारी, मंचर (ता. आंबेगाव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC चा मोठा प्लॅन! फ्लायओव्हरमुळे प्रवासात २५ मिनिटांची बचत होणार, कुठून कुठे बांधणार? जाणून घ्या मार्ग...

IPL 2026 : युझवेंद्र चहल 'ओपनिंग'ला येणार? पंजाब किंग्सची मालकीण Preity Zinta ने मान्य केली मागणी; म्हणाली, तुझ्यासाठी कायपण..

Latest Marathi News Live Update : नोएडाच्या सेक्टर १२१ परिसरात एका कारला आग लागली

Bike Accident : धनगरपिंपळगाव येथील तीस वर्षीय प्रवीण पांजगे या दुचाकी चालकाचा अपघातात मृत्यू

IPL 2026 : वैभव सूर्यवंशी बॅटमध्ये 'AI Chip' लावून खेळतोय! पाकड्यांच्या पोटात दुखतंय, उलटसुलट आरोप करत सुटलेत...

SCROLL FOR NEXT