मंचर, ता. २७ : खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्यांमध्ये सध्या व्यावसायिक (१९ किलो) गॅस सिलिंडरचा पुरवठा मोठ्या प्रमाणात विस्कळित झाला असून, दरात लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या दोन महिन्यांच्या तुलनेत परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. या तीन तालुक्यांत सुमारे २ हजार ८०० पेक्षा अधिक व्यावसायिक ग्राहक आहेत.
याशिवाय, पूर्वी २४ तासांच्या आत उपलब्ध होणारा सिलिंडर आता एकूण मागणीपैकी २० टक्केच मिळतो. तर बाजारात ब्लॅक मार्केटचे प्रमाणही वाढल्याची चर्चा आहे. अधिकृतपणे उपलब्ध नसलेला सिलिंडर तीन ते चार हजार रुपयांपर्यंत विकला जात असल्याची माहिती मिळत असून, हा दर नियमित किमतीपेक्षा दुप्पट रुपयांनी अधिक आहे. एकूणच, गॅस सिलिंडरचा वाढलेला दर, पुरवठ्यातील विलंब आणि ब्लॅक मार्केटमुळे खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. कंपन्यांकडून वितरकांना पूर्वी प्रमाणे गॅस सिलिंडर मिळण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती सुरळीत करावी, अशी मागणी होत आहे. एकूण गॅस सिलिंडर टाक्यांपैकी सध्या कंपन्यांकडून २० टक्केच पुरवठा केला जात आहे. त्यामुळे अनेक हॉटेल व्यावसायिक व मंगल कार्यालय मालकांनी थेट आता सरपणाचा वापर करून पारंपरिक चुली तसेच कोळशाचा वापर करून शेगडीवर पदार्थ तयार करण्यास सुरुवात केली आहे.
प्रकार...पूर्वीचा किलोचा दर... सध्याचा किलोचा दर
सरपण : ०५***१२
कोळसा : ३० ***३२ ते ३३
तपशील***युद्धापूर्वी (फेब्रुवारी २०२६ )** दोन महिन्यांनंतर (एप्रिल २०२६ )***फरक (वाढ)
सिलिंडरचा दर (१९ किलो)**१,८५० -१,९००**२११५.५०- २२५०**३००-३५०
पुरवठा वेळ***२४ तासांत उपलब्ध*** ५ ते ६ दिवस प्रतीक्षा**विस्कळित
ब्लॅक मार्केट दर***उपलब्ध नाही***३००० - ४०००***अंदाजे ८०० ते १८००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.