पुणे

वडगाव काशिंबेगमध्ये बैलगाडा शर्यतीचा जल्लोष

CD

मंचर, ता. २२ : श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग (ता. आंबेगाव) येथे गणेश फेस्टिव्हल २०२६निमित्त आयोजित बैलगाडा शर्यतीचा प्रारंभ रविवारी (ता. २०) झाला. गुरुवारी (ता. २४) फेस्टिव्हलची सांगता होणार आहे. तालुक्यातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत असून ९०१ बैलगाडा मालकांनी नाव नोंदणी केली आहे. रविवारी व सोमवारी ३२० बैलगाडे धावताना उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली. घाटाचा राजा हा किताब हॉटेल मयूर रामशेठ बाबुराव थोरात यांच्या बैलगाड्याला देण्यात आला.
रविवारी अर्धपीठ गणपती मंदिरापासून निशाणाची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर शर्यतीचा प्रारंभ झाला. जितेंद्र बबनराव लोंढे यांचा बैलगाडा फळीफोड ठरला. द्वितीय क्रमांकाची फळी देवांश विक्रांत शेवाळे तर तृतीय क्रमांकाची फळी मंगेश भगवान मुळे यांच्या बैलगाड्यांनी फोडली. सोमवारी मंचर येथील राजवीर नितीन थोरात यांच्या बैलगाड्याने प्रथम क्रमांकाची फळी फोडली. द्वितीय क्रमांकात पार्थ ऋतिक राजगुरव तर तृतीय क्रमांकात संतोष बबन कोंडे यांचे बैलगाडे फळीफोड ठरले.
प्रथम क्रमांकातील विजेत्या बैलगाड्यांची सायंकाळी फायनल शर्यत झाली. या शर्यतीने रंगत आणली. शिवसेना नेते रमेश येवले, कुलस्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष शंकर पिंगळे यांनी बैलगाडा मालकांना शुभेच्छा दिल्या. शर्यती पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लालबागच्या राजाच्या चरणी केलेलं दान कुणाच्या खिशात जातंय? अभिनेत्रीने ठेवलेली ५०० ची नोट गायब होताच, नेटकऱ्यांचा सवाल

INDW vs SLW Final : 'गोल्डन गर्ल्स'! भारतीय संघाने इतिहास रचला, श्रीलंकेला नमवून जिंकले दुसरे सुवर्णपदक; स्मृती, शफाली, रिचा चमकल्या

Hupari Rendal Police News : पत्नीच्या निधनाच्या नैराश्यातून रेंदाळमध्ये वृद्धाची आत्महत्या

IND vs JPN, T20I: जपानने भारतीय संघाचा धूर काढला! श्रेयसचा संघ अवघ्या २ धावांनी जिंकला, फलंदाज गंडले, गोलंदाजही रडले

Marathi News Live Updates : राज्यात बहुंताश ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT