पुणे

बारामती-फलटण महामार्गाची दुरवस्था

CD

माळेगाव, ता. १४ : बारामती-सांगवी-फलटण महामार्गाच्या रुंदीकरणासाठी केंद्र सरकारच्यावतीने सुमारे सातशे कोटी रुपये मंजूर झाले. असे असतानाही काम रखडल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविले नाहीत. दिशादर्शक फलक लावले नाहीत. मूळ रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साइट पट्ट्या खचल्या आहेत. परिणामी लाहनमोठ्या अपघाताचे प्रमाण लक्षणीय वाढले आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेबाबत संबंधित अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा, दुर्लक्ष कारणीभूत असल्याने नागरिक, प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे.

बारामती पाहुणेवाडी हद्दीतील पुलावरील खड्डे वाचविताना स्कूल बस ओढ्यात कोसळल्याची घटना ताजी आहे. याबाबत वारंवार विरोधीपक्ष नेते अजित पवार संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने काम सुरू करण्याच्या सूचना देत आहेत. परंतु याकामी बांधकाम व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचा आणि संबंधित शेळके कंस्ट्रक्शन कंपनीच्या प्रशासनाचा कसलाच समन्वय नसल्याची माहिती पुढे आली आहे. याबाबत अनेकांनी अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाच्या तक्रारी वरिष्ठ पातळीवर केल्या आहे.

बारामती-सांगवी-फलटण महामार्गाच्या रुंदीकरणासाठी दोन महिन्यापूर्वी प्रारंभही केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाला. अर्थात या रस्त्याचे काम कमीकालावधीत अधिक दर्जेदार होण्यासाठी स्वतः विरोधीपक्षनेते अजित पवार प्रयत्नशील आहेत. बारामती आणि फलटण तालुक्याला जोडणाऱ्या राज्यमार्गाचे रूपांतर राष्ट्रीय महामार्गामध्ये झाले आहे. अर्थात दोन पालखी मार्गाला जोडणारा बारामती-फलटण रस्ता हा महत्त्वाचा मानला जातो. शिवाय या रस्त्यावरील दैनंदिन वाहतूकही प्रचंड आहे. या रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबुतीकरण व्यवस्थित होण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार यांचा केंद्राकडे पाठपुरावा उल्लेखनीय ठरला आहे. या रस्त्याच्या भूसंपादनासाठी ६९ कोटी रुपये महसूल विभागाकडे वर्ग झाले आहेत. त्यानुसार संबंधित खात्यानेही जवळपास ४९ कोटींचे वाटप बाधित शेतकऱ्यांना केले आहे. असे असतानाही अद्याप बारामती-फलटण रस्त्याचे काम सुरू करण्याबाबत हलगर्जीपणा दिसून येत आहे.

संबंधित शेळके कंस्ट्रक्शन कंपनीच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले की, आम्हाला अद्याप बांधकाम विभागाकडून कामाची वर्क ऑर्डर मिळालीच नाही. त्यामुळे काम करू शकत नाही. दुसऱ्याबाजूला या रस्त्याचे रूपांतर महामार्गात झाले आहे. त्यामुळे त्याच्याशी आमचा संबंध नाही, अशापद्धतीचे उत्तर बारामती बांधकाम विभागाकडून देण्यात आले. ज्यांच्याकडे या महामार्गाच्या कामाची जबाबदारी आहेत, ते कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे रजेवर असल्याचे सांगण्यात आले, तर उपविभागीय अभियंता महेश पाटील यांना अनेकदा संपर्क केला असता त्यांचाही संपर्क होत नाही.
.......
बारामती तालुक्यात सहा गावांचा भूसंपादनामध्ये समावेश आहे. बारामती, पाहुणेवाडी, खांडज, मळद, शिरवली, सांगवी या गावांचा समावेश आहे. या गावामधील अंतिम भूसंपादन २०१६-१७ मध्ये घोषित केलेले आहे. रस्त्यासाठी ४० मीटर रुंदीने भूसंपादन झाले आहे. या प्रक्रियेत मोजक्या लोकांचे प्रश्न शिल्लक असून तेही प्रश्न लवकर सुटतील. त्यामुळे रस्त्याचे काम संबंधित कंपनीला सुरू करण्यास कोणतीच अडचण नाही. कामाची वर्कऑर्डर चार महिन्यापूर्वीच झाली आहे.
- मिलिंद बारभाई, कार्यकारी अभियंता अधिकारी, बांधकाम विभाग
...
पाहुणेवाडी (ता.बारामती) : पुलाची दुरवस्था झाल्याने वाहतुकीला बनलेला धोका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाताच्या सलामीवीरांची दणक्यात सुरुवात, 5 ओव्हरमध्येच पूर्ण केल्या 60 धावा

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT