पुणे

माळेगावात गुरुवारी मधमाशी दिवस साजरा

CD

माळेगाव, ता. २३ ः अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती संचलित माळेगाव कृषी विज्ञान केंद्रामध्ये गुरुवारी (ता.२३) जागतिक मधमाशी दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शेतकऱ्यांना मधमाशीच्या विविध जाती, मधमाशीचे परागीभवनात महत्त्व, मध आणि मधाचे विविध पदार्थ व त्यांच्या प्रक्रियेला चालना देण्यासाठी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न पदार्थ उद्योग योजनेबाबत माहिती दिली.
तसेच मधमाशांचे कीड व रोग आणि त्यांचे व्यवस्थापन अशा विविध विषयांवरही तज्ज्ञांकडून मार्गदर्शन झाले. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. धीरज शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी डाॅ. शिंदे यांनी कृषी क्षेत्रात मधमाशीचे अनन्य साधारण महत्त्व असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी रोजगार निर्मितीसाठी मधुमक्षिका पालन हे कशा पद्धतीने उपयोगी ठरेल, याची विस्तृत माहिती शेतकऱ्यांना दिली. प्रशिक्षण समन्वयक प्रशांत गावडे यांनी मधमाशी पासून मिळणारे विविध उत्पादनाची माहिती देत उत्पादनांचे विक्री व्यवस्थापन उपस्थितांना समजून सांगितले. प्रात्यक्षिकांसहित मधमाशीची योग्य हाताळणी, नैसर्गिक पद्धतीने शुद्ध मधाची काढणी, जागतिक बाजारपेठेत मधमाशीपासून मिळणाऱ्या पदार्थांचे महत्त्व आदी विषयांच्या आधारे डॉ.मिलिंद जोशी, अल्पेश वाघ, सचिन क्षीरसागर, संतोष गोडसे यांनी मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivraj Singh Chouhan News : शेतकऱ्यांसाठी Good News!, केंद्रीय कृषिमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, म्हणाले..

Video: वाल्मिक कराड पुन्हा करु शकतो जामिनासाठी अर्ज; जाणून घ्या काय आहे तरतूद?

Latest Marathi News Live Update : पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवणार - प्रफुल पटेल

IND vs ZIM, T20 WC: आफ्रिकेच्या विजयाने टीम इंडियाचा भार हलका केला! झिम्बाब्वेविरुद्ध संघ प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करून उतरला

Baramati News : बारामती नगरपरिषदेच्या पहिल्याच बैठकीत नगरसेवक आक्रमक...

SCROLL FOR NEXT