पुणे

बारामतीत सहलीच्या पॅकेजमध्ये महिलेची फसवणूक

CD

माळेगाव, ता. ८ : बारामतीत एका सोव्हेनियर इंटरनॅशनल प्रा. लि. कंपनीच्या संचालक व त्यांच्या स्टाफने सहलीचे पॅकेज देतो, असे सांगून इंदापूर तालुक्यातील शेटफळगडे गावच्या महिलेची ६५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची माहिती शनिवारी उघड झाली.
त्या प्रकरणी ज्योती हनुमंत कदम (वय ३०, व्यवसाय गृहिणी, रा. शेटफळगडे, ता. इंदापूर) यांनी शनिवारी बारामती तालुका पोलिस ठाण्यात सोव्हेनियर इंटरनॅशनल प्रा. लि. कंपनीच्या ११ संबंधित लोकांविरुद्ध फिर्याद दिली. उपलब्ध फिर्याद व प्रथमदर्शनी केलेल्या तपासाच्या आधारे पोलिसांनीही शनिवारी दुपारी आर्थिक फसवणूक करणे आदी कलमान्वये ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची संशयित आरोपींमध्ये असिया माजीद बेलिफ (रा. मुंबई), रवी प्रदीप चावरिया (धंदा-सेल्समन. मुब्रादेवी कॉलनी, ठाणे), असिफ निमाजुद्दीन अन्सारी
(रा. अलसफा हाईट, ठाणे), पृथ्वी रामजी परमार (रा. मानव कल्याण हॉस्पिटल दहिसर, मुंबई), सागर श्यामलाल गुप्ता (रा. मिलिंदनगर काटेमानवली रोड, कल्याण पूर्व), फयाद रियाज खान (रा. अनिस कंपाउंड साकीनाका अंधेरी), ऋषीकेश भिकाजी घाग (रा. मालाड पूर्व), यशोदरा राजेंद्रसिंग गडाळे (रा. जोगेश्वरी पूर्व), माधुरी वीरेंद्र दुणे (रा. ट्रामा हॉस्पिटल जवळ जोगेश्वरी), मशिमुक्तार सिद्दीकी (रा. बांद्रा पूर्व मुंबई), अक्षय हनुमंत शिंदे (रा. मुंबई) यांचा समावेश आहे. सहाय्यक फौजदार दत्तात्रेय लवंडे वरील प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT