पुणे

तब्बल अकरा कोटींचा घोडा गाजवतोय मैदान

CD

माळेगाव, ता. १८ : आधुनिक शेतीला नवे रूप देणाऱ्या कृषिक प्रदर्शनात यंदा ११ कोटी रुपये किंमतीचा मारवाडी जातीचा घोडा मैदान गाजवत आहे. सोबतच दीड टन वजनाचा एक कोटी रुपये किमतीचा कमांडो नावाचा रेडा आणि मुका घेणारी सोन्या-मोन्या ही बैलजोडी चर्चेचा विषय ठरत आहे. याशिवाय ग्लोबल ते लोकल कृषी तंत्रज्ञान घेऊन आलेल्या कृषिक प्रदर्शनात यंदा नवसंशोधकांचे शेती व शेतीपूरक प्रकल्प वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहेत.
बारामती-शारदानगर येथे भरविलेल्या कृषिक प्रदर्शन हजारो शेतकऱ्यांनी आज तिसरा दिवस हाऊसफूल्ल केल्याचे दिसले. शेतकऱ्यांना पशुपालनासाठी आवश्यक असणाऱ्या उत्तम पशू जातींची वैशिष्ट्ये व त्यांची माहिती व्हावी, पशुपालन व्यावसायात नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात, हे उद्दिष्ट समोर ठेवून बारामती कृषी विज्ञान केंद्राने कृषिक प्रदर्शनाच्या माध्यमातून अश्‍वप्रदर्शन आणि पशू-पक्षी प्रदर्शन उभारले आहे. यात मारवाडी आणि भीमथडी उत्तम प्रतीचे अश्‍व प्रदर्शित केले आहेत. देखणे, दिमाखदार अश्‍व, खिल्लार कालवडी, विविध प्रकारचे पक्षी पाहून विशेषतः तरुण शेतकऱ्यांची पावले या प्रदर्शनाकडे वळल्याचे दिसून आले. विशेषतः ११ कोटी रुपये किमतीचा मारवाडी जातीचा घोडा या प्रदर्शनात आणून हैदराबादचे नवाब हसन बिनत्रिफ यांनी चांगलीच धमाल उडवून दिली. राजेंद्र पवार यांच्या हस्ते शनिवारी (ता. १८) संबंधित शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. लोहा तालुक्यातील विश्‍वनाथ जाधव यांनी आणलेल्या राम व रावण या लालकंधारी जातीची बैलांची जोडीलाही पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.


‘खिलार जनावरे जपा’
‘‘सोन्या-मोन्या हे आमच्या घरातील सदस्य असून, त्यांनी आम्ही मुलांप्रमाणे संभाळतो. सोन्या-मोन्या मुका घे म्हटले, की मुका घेणार, पाय जुळवून घे म्हटले की घेणारच. हिंदकेसरीचा किताब मिळवून या सोन्या-मोन्याने आपले नाव महाराष्ट्र, कर्नाटकापर्यंत गाजविले आहे. खिलार जनावरे जपा आणि माया लावा, तुम्हालासुद्धा ही जनावरे खूप आनंद देऊन जातील,’’ असे सांगून संतोष कोकणे उपस्थित शेतकऱ्यांमध्ये देशी जनावरांचे महत्त्व पटवून देत आहेत.

देशभरातील शेतकरी घेताहेत माहिती
राज्यातीलच नव्हे, तर देशातील शेतकरी शनिवारी आधुनिक तंत्रज्ञान व नवीन शेती पद्धतींबाबत माहिती कृषिकमध्ये घेताना दिसले. नोकरीकडे न वळता शेती व्यवसायात काहीतरी नवीन करायचे आणि आपल्याबरोबर इतर शेतकऱ्यांना सुज्ञ करायचे, ही संकल्पना सीताराम कणसे (कऱ्हाड, जि. सातारा) यांच्यासह बहुतांश शेतकऱ्यांनी बोलून दाखविली. शेतीमधील समस्यांचा अभ्यास करून कमी खर्चात जास्त उत्पादन कसे घेता येईल, या गोष्टींची माहिती घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT