पुणे

माळेगावात नवीन पदव्युत्तर अभ्यासक्रमास मान्यता

CD

माळेगाव, ता. २ : माळेगाव बुद्रूक (ता. बारामती) येथील शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या माळेगाव अभियांत्रिकी महाविद्यालयात चालू शैक्षणिक वर्षापासून एआय व मशिन लर्निंग या अत्याधुनिक शाखेचा प्रारंभ होत आहे. एमई कॉम्प्युटर व एमई सिव्हिल स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग या पदव्युत्तर अभ्यासक्रमास अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (एआयसीटीई) नवी दिल्ली या संस्थेची अधिकृत मान्यता प्राप्त झाली आहे.
प्रथम वर्षात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कक्ष सुरु केला आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. शैलेंद्र कुमार मुकणे यांनी दिली. हे महाविद्यालय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आहे. ग्रामीण भागातील एक मानांकित शिक्षण संस्था म्हणून महाविद्यालयाकडे पाहिले जाते. त्याचाच एक भाग विचारात घेत या महाविद्यालय प्रशासनाने यंदा नवीन अभियांत्रिकी शाखेचा प्रारंभ करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम, करिअर संधी व प्रवेश प्रक्रियेबाबत माहिती दिली जात आहे.
याबाबत डॉ. मुकणे म्हणाले, ‘‘एआय व एमएल ही तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वाधिक मागणी असलेली आणि भविष्यातील उद्योगांची गरज असलेली क्षेत्र आहेत. या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना डेटा सायंटिस्ट, मशिन लर्निंग इंजिनिअर, रोबोटिक्स व ऑटोमेशन तज्ज्ञ, एआय संशोधक (कृषी व वैद्यकीय क्षेत्र), तज्ज्ञ यासारख्या विविध क्षेत्रात काम करण्याच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्याबरोबरच स्टार्टअप्स व इनोव्हेशनच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधीही त्यांना मिळेल. अभ्यासक्रमासाठी इंडस्ट्री-ओरिएंटेड सिलॅबस, आधुनिक लॅब सुविधा आणि इंटर्नशिपसाठी उद्योगांसोबत सामंजस्य करार (एमओयुएस) केले आहेत. परिणामी, विद्यार्थ्यांना त्यांच्या तांत्रिक कौशल्यात वाढ करण्याची आणि अद्ययावत टेक्नॉलॉजीचे ज्ञान मिळवण्याची संधी प्राप्त होणार आहे.’’
एआय व एमएल या शाखेची वाढती गरज लक्षात घेता विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवनगर संस्थेचे सचिव डॉ. धनंजय ठोंबरे यांनी केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. केशवराव जगताप, विश्वस्त वसंतराव तावरे, अनिल जगताप, महेंद्र तावरे, रामदास आटोळे, गणपत देवकाते, रवींद्र थोरात, सीमा जाधव, चैत्राली गावडे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

Ashadhi Ekadashi: मुंबईहून थेट पोहोचणार पंढरपुरात, आषाढी वारीसाठी विशेष एसटीचे आयोजन, कसे असेल वेळापत्रक?

Viral Video: कमरेवर हात अन्...; खेळण्याच्या वयात चिमुकल्याचा पोटासाठी संघर्ष, पुण्यातील 'हा' व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

PM Narendra Modi: ''घाना देशातल्या ९०० प्रकल्पांमध्ये भारतीय कंपन्यांची गुंतवणूक'', द्वीपक्षीय संबंधांवरही मोदी स्पष्ट बोलले

SCROLL FOR NEXT