पुणे

माळेगावात पहिला मान ओबीसी महिलेला

CD

माळेगाव, ता. ६ ः माळेगाव बुद्रूक (ता. बारामती) नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची आरक्षण सोडत सोमवारी (ता. ६) जाहीर झाली. हे पद इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित ठरले आहे.
नगरपंचायत स्थापनेनंतर पहिल्यांदाच आगामी काळात पंचवार्षिक निवडणूक होत आहे. त्यानुसार नगराध्यक्षपदाचा पहिला मान ओबीसी महिलांना मिळणार आहे. अर्थात गावातील येळे, गोफणे, वाघमोडे, बनसोडे, जाधव आदी आडनावाच्या महिलांना संधी मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला. याशिवाय कुणबी प्रमाणपत्र असलेल्या तावरे व इतर कुटुंबातील महिलांनाही नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाग घेता येणार आहे. त्यामुळे माळेगाव जिंकण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजप पक्षात रस्सीखेच पहायला मिळणार आहे.
शासन स्तरावर माळेगाव बुद्रूक नगरपंचायतीची स्थापना चार वर्षांपूर्वी झाली. ग्रापंचायत प्रशासनानंतर आजवर नगरपंचायत प्रशासन तत्कालीन मुख्याधिकारी स्मिता काळे, विद्यमान मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांच्या आधिपत्याखाली सुरू आहे. या प्राप्त स्थितीच आता शासनस्तरावर माळेगावच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत पार पडली. या सोडतीकडे ओपन, ओबीसी, एसी आदी प्रवर्गातील आजी- माजी पदाधिकारी व कार्यकर्ते डोळे लावून बसले होते. मात्र, या प्रक्रियेत पहिला नगराध्यक्ष पदाचा मान ओबीसी महिलेला मिळाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या स्पर्धात्मक चर्चेला पूर्णविराम मिळाला.
दरम्यान, नव्याने स्थापना झालेल्या माळेगावमध्ये सुमारे ३५० कोटी रुपयांच्या विकास कामांना नुकतीच शासनस्तरावर प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामध्ये रस्ते, पिण्याच्या पाण्याची वाढीव सुविधा, सांडपाण्याची व्यवस्था, दिवाबत्ती, प्रशासकीय इमारत, शिक्षण, क्रीडांगण आदी कामांचा समावेश आहे. या विकास कामांना अधिक गतीने चालना देणे आणि सुमारे ४० हजार लोकसंख्या असणाऱ्या माळेगावला समृद्ध करणे, आदी कामांची जबाबदारी यापुढे महिला नगराध्यक्षांवर पडणार आहे.
02915

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Calls Chief Justice Gavai: सरन्याधीश गवईंना पंतप्रधान मोदींचा फोन; सर्वोच्च न्यायालयातील 'त्या' घटनेची घेतली गंभीर दखल!

सुपरस्टार अभिनेता Vijay Deverakonda च्या कारचा भीषण अपघात! नेमकं काय घडलं? पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला

Georai Nagarparishad Election : बीडमधील गेवराईचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव; गीता पवार, शितल दाभाडे दावेदार

Raju Shetty : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काटामारी मान्य केली; मग कारवाई का नाही

S.T. Workers: दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा इशारा; मशाल मोर्चा निघणार, नेमक्या मागण्या काय?

SCROLL FOR NEXT