माळेगाव, ता.१० : बारामती कृषी विज्ञान केंद्राने एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कृषी क्षेत्राला योग्य दिशा दिली आहे. क्रांतिकारक नव्या प्रकल्पाबरोबर शेती आणि शेतीपूरक व्यवसायांची प्रात्यक्षिके पाहण्याची संधी कृषिक प्रदर्शन २०२६ मध्ये आहे. येत्या शनिवारी (ता.१७) आयोजित केलेल्या या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत, माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. प्रदर्शनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना नव्या वर्षात नवी शिदोरी मिळणार आहे, अशी माहिती अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी दिली.
शेतकऱ्यांना देश-विदेशांतील आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, निविष्ठांच्या माहितीचा खजिना, विविध पिकांचे प्रात्यक्षिके पाहण्याची संधी असलेले कृषिक २०२६ हे कृषी प्रदर्शन यंदा १७ ते २४ जानेवारी या कालावधीत होणार आहे. आजवर हे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी पर्वणी ठरलेले आहे. अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे बारामती कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) गेली १० वर्षांपासून अखंडपणे कृषी प्रदर्शन भरवते. आजवर सुमारे २० लाख शेतकऱ्यांनी या ‘कृषिक’ला भेट दिल्याची नोंद आहे. सालाबाद प्रमाणे यंदाही ‘कृषिक’ची जय्यत तयारी झाली आहे, त्या पार्श्वभूमिवर पत्रकार परिषदेमध्ये पवार बोलत होते. यावेळी संस्थेचे सीइओ नीलेश नलावडे उपस्थित होते. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे, खासदार सुप्रिया सुळे आदी पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.
विज्ञानाची जोड दिल्यास शेती समृद्ध
पारंपरिक शेतीला कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) जोड देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचा जो यशस्वी प्रयोग बारामतीत झाला आहे, त्याची दखल आता केवळ केंद्र-राज्य सरकरानेच नव्हे तर जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान कंपन्यांनीही घेतली आहे. आज केव्हीके बारामतीचा एआय ऊस शेती प्रकल्प दाखवितो की, परंपरेला विज्ञानाची जोड दिल्यास शेती समृद्ध, आधुनिक आणि टिकाऊ होऊ शकते. हा प्रकल्प केवळ तांत्रिक प्रयोग न राहता, भारताच्या कृषी भविष्याची दिशा ठरविण्यास आदर्श मॉडेल ठरत आहे. त्यामुळे शेती क्षेत्रातील रचलेला हा एक नवा इतिहास उलगडून पाहण्याची संधी यंदा कृषिकच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार आहे, असे मत राजेंद्र पवार यांनी बोलून दाखविले.
हे पहावयास मिळणार
उसाचे प्रतिएकर दोनशे टन उत्पादन व खोडव्याचे दीडशे टन उत्पादन
नावीन्यपूर्ण फळ झाडांची लागवड, ५०० ग्रॅमपर्यंतचा कांदा
विविध पिकांची प्रात्यक्षिकांची रेलचेल
हायड्रोफोनिक भाजीपाला तंत्रज्ञान, कलमी भाजीपाला
विविध रंगातील स्वीटकॉन, परदेशी कटफ्लॉवरची प्रात्यक्षिके
रोबोटिक तन नियंत्रण, स्वतंत्र पशुदालन
भरडधान्य, कृषी संशोधन, कृषी शिक्षण संस्था
बियाणे, अवजारे क्षेत्रातील कंपन्यांचे स्टॉल हार्वेंस्टींगसह कापणी यंत्रे,
प्रक्रिया उद्योग, पॅकेजिंग, ड्रीप, टिश्यूकल्चर क्षेत्रातील नामवंत कंपन्या.
03013
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.