पुणे

पशुधनांच्या विविधतेने शेतकरी थक्क

CD

माळेगाव, ता. १९ : माळेगाव खुर्द (ता. बारामती) येथील कृषिक प्रदर्शनात स्वतंत्र उभारलेल्या पशुदालनाने शेतकऱ्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले. देशभरातील विविध जातींच्या गाई, म्हैस, बैल, शेळ्या, मेंढ्या तसेच श्वान पाहण्यासाठी तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. पशुधनाच्या विविधतेने अनेक शेतकरी थक्क झाले. त्यामध्ये महाराष्ट्रासह विविध जिल्ह्यांसह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, हरियाना आदी राज्यांतील शेतकऱ्यांचा समावेश होता.

माळेगाव येथील कृषिक प्रदर्शनात प्रथमच स्वतंत्र अश्व प्रदर्शनाची आकर्षक मांडणी केली आहे. यामध्ये भीमथडी घोड्याने विशेष लक्ष वेधले. त्याची उंची, ताकद व सौंदर्य पाहण्यासाठी नागरिक आणि शेतकरी उपस्थित होत आहेत. पारंपरिक मराठी घोड्यांच्या संवर्धनासाठी अशा प्रदर्शनांचे महत्त्व खूप आहे, असे मत अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे विश्वस्त रणजित पवार, मोहन शितोळे (अमरावती-शेतकरी) आदींनी व्यक्त केले.

अल्पभूधारक व लहान शेतकऱ्यांसाठी कमी खर्चात अधिक उत्पन्न देणाऱ्या शेळीपालन, कोंबडीपालन व मत्स्यपालनाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिके या ठिकाणी सादर करण्यात आली आहेत. याशिवाय अत्याधुनिक डच डेअरी तंत्रज्ञानाची माहिती व प्रत्यक्ष मॉडेल्स पाहून शेतकरी आश्चर्यचकित झाले आहेत. स्वयंचलित दूध काढणी यंत्रणा, जनावरांचे आरोग्य व्यवस्थापन व आधुनिक गोठा पद्धतीमुळे उत्पादन खर्च कसा कमी होतो, याची प्रत्यक्ष माहिती शेतकऱ्यांना मिळत आहे.

दूध उत्पादन स्पर्धांना प्रतिसाद
प्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या जनावरांच्या दूध उत्पादन स्पर्धांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. उच्च दूध उत्पादन क्षमतेच्या गायी व म्हशी पाहून अनेक शेतकरी आधुनिक पशुपालनाकडे वळण्याची इच्छा व्यक्त करत आहेत, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. रतन जाधव यांनी व्यक्त केला.


बारामती–माळेगाव कृषी प्रदर्शनात पशुधन, तंत्रज्ञान व नव्या संधींचा सुरेख संगम पाहायला मिळत असून शेतकऱ्यांसाठी हे प्रदर्शन ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी ठरत आहे.
- दिग्विजय जगताप, बिदाल, ता.मान. (जिल्हा सातारा)

पंजाबीबिटल जातीच्या बोकडाची ‘क्रेज’
दिग्विजय जगदाळे या शेतकऱ्याच्या मालकीचे १२० किलो वजनाचे बोकड कृषी प्रदर्शनात लक्ष वेधून घेत आहे. त्याची उंची ४८ इंच इतकी आहे. हा वैशिष्ठ्यपूर्ण बोकड सहा दातांचा झाला आहे. त्याची आई एकावेळी तीन लिटर दूध देत आहे. त्यामुळे या बोकडाची ‘क्रेज’ प्रदर्शनात वाढली आहे.

03061

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Electricity Bill: वीज ग्राहकांना दिलासा! महाराष्ट्रात वीज दर कमी होणार; पण कितीने? देवेंद्र फडणवीसांनी आकडाच सांगितला

असं कोणी करतं का? रशियन महिलेचा ढोकळा-प्रकरण पाहून लोकांनी डोकं धरलं...पाहा viral video

अहो माहेरी जाऊया ना...पत्नीचं ऐकून पती सासरी गेला; पण रागात सासऱ्यांनी 'त्या' गोष्टीमुळे क्रूरपणे जावयाचा जीव घेतला

Latest Marathi News Live Update : सोलापुरात पदनिवडीवरून मराठा समाजात मतभेद; क्रांती मोर्चाचा तीव्र विरोध

Helicopter crash news : देव तारी त्याला कोण मारी! हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; एकाच घरातील ५ जण अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या कुटुंबाबाबत घडलं भयानक

SCROLL FOR NEXT