पुणे

इलेक्ट्रिक ट्रॅक्टर शेतकऱ्यांचे आकर्षण

CD

माळेगाव, ता. २२ ः शारदानगर (ता. बारामती) येथील ‘कृषिक’ प्रदर्शन पाहण्यासाठी गुरुवारी (ता. २२) शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी प्रदर्शनातील विनाआवाज चालणाऱ्या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरने शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.
या प्रदर्शनाला तेलंगाणा राज्याचे माजी कृषी व रेशीम आयुक्त व्यंकट राम रेड्डी यांनी गुरुवारी भेट देत विविध दालनांची पाहणी केली. यावेळी परभणी, अकोला, लातूर, बुलडाणा, सोलापूर, कोल्हापूर, खानदेश भागामधील जळगाव, नाशिक, धुळे आदी जिल्ह्यातून शेतकरी आले होते. याशिवाय कर्नाटक, तेलंगणा येथील शेतकऱ्यांनीही भेट दिली. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेतीसाठी उपयुक्त उपकरणांची माहिती त्यांनी जाणून घेतली.
शेतीच्या दैनंदिन कामांमध्ये उपयुक्त ठरणारे २७ व ३२ अश्वशक्तीचे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आंतरमशागत, नांगरणी, रोटावेटर यांसारख्या कामांसाठी प्रभावी ठरत आहेत, अशी माहिती बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या प्रतिनिधींनी दिली. डिझेलची गरज नसल्यामुळे पर्यावरणपूरक ठरणारे हे ट्रॅक्टर एका चार्जिंगमध्ये सुमारे चार तास कार्यक्षम राहतात. विशेष म्हणजे या ट्रॅक्टरच्या चार्जिंगसाठी केवळ २३० रुपये इतकाच खर्च येत असल्याने इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शांतपणे चालणारे, कमी देखभाल खर्चाचे आणि प्रदूषणमुक्त असे हे ट्रॅक्टर शेतीच्या खर्चात लक्षणीय बचत करणार असल्याचे मत यवतमाळ येथील शेतकरी सदाम घोरपडे यांनी व्यक्त केले.
प्रदर्शन स्थळी इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. अनेक शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष वापर, क्षमतेविषयी, तसेच अनुदानाबाबत चौकशी केल्याचेही दिसून आले. आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारत शेती अधिक किफायतशीर व शाश्वत करण्याच्या दिशेने हे प्रदर्शन मार्गदर्शक ठरत असल्याची प्रतिक्रिया सातारा जिल्ह्यातील शेतकरी नारायण जगदाळे व्यक्त केली.

उद्या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस
दरम्यान, कृषिक प्रदर्शन शनिवारपर्यंत (ता. २४) खुले राहणार आहे. अॅग्रिकल्चरल ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र दादा पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे, कृषी विज्ञान केंद्रातील प्रतिनिधींनी उपस्थित शेतकऱ्यांच्या सूचना ऐकून घेतल्या. त्यांचे आवडलेले विषय जाणून घेतले. विशेष करून ‘एआय’च्या ऊस व भाजीपाला प्लॉटला शेतकरी जास्त माहिती घेतल्याचेही दिसून आले.

03071

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रजासत्ताक दिनापूर्वी शौर्याचा गौरव! ९८२ वीरांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर; यादीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?

Viral Video : हे फक्त भारतातच घडू शकते! व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल

PADMA AWARDS: पद्म पुरस्कारांची मोठी घोषणा! तमाशा कलाकार रघुवीर खेडकरांचा होणार पद्म पुरस्काराने सन्मान

T20 World Cup : पाकिस्तानने माघार घेतल्यास कोणता संघ त्यांची जागा घेईल? भारतासमोर बघा कोणता संघ उभा ठाकेल

"होता जिवा म्हणून वाचला शिवा"! शिवरायांचा जीव वाचवणाऱ्या जिवा महालाचे वंशज सध्या कुठे असतात? इतकी दयनीय अवस्था अन् हातावरचं पोट..

SCROLL FOR NEXT