पुणे

‘माळेगाव’ला शोकसभेत उपस्थितांचे डोळे पाणावले

CD

माळेगाव, ता. ३० : ‘‘महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाच्या विकासाची धुरा समर्थपणे पुढे नेणे आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अपूर्ण स्वप्नांना दिशा देणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल,’’ असे भावनिक मत बारामती पंचायत समितीचे माजी सभापती अविनाश गोफणे यांनी व्यक्त केले.
माळेगाव (ता. बारामती) सहकारी साखर कारखान्याच्या वतीने आयोजित शोकसभेत ते बोलत होते. शेतकरी, कामगार, सभासद आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोफणे म्हणाले, ‘‘अजितदादा हे केवळ राजकीय नेते नव्हते, तर ग्रामीण भागाच्या विकासाचे चालते-बोलते विद्यापीठ होते. पाणी, शेती, सहकार, उद्योग आणि रोजगार या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी आहे.’’
यावेळी ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे, उपाध्यक्षा संगीता कोकरे, संचालक योगेश जगताप, नितीन शेंडे, अविनाश देवकाते, राजेंद्र तावरे, अशोकराव तावरे, शेखर जगताप, सुरेश देवकाते, रणसिंग आटोळे, प्रा. अनिल धुमाळ आदी मान्यवरांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. दादांच्या नेतृत्वाखाली माळेगाव साखर कारखान्याने केलेली प्रगती, शेतकऱ्यांप्रती असलेली त्यांची तळमळ आणि सहकारावरचा ठाम विश्वास यांचा उल्लेख करत उपस्थितांचे डोळे पाणावले.
‘‘कारखाना म्हणजे केवळ साखर उत्पादनाचा उद्योग नसून, तो हजारो कुटुंबांचा आधार आहे,’ ही अजितदादांची भूमिका होती,’ असे सांगत अविनाश देवकाते, नितीन शेंडे यांनी त्यांच्या निर्णयक्षमतेचा आणि कठोर शिस्तीचा उल्लेख केला. शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळप होणे, कामगारांचे हित जपणे आणि सभासदांचा विश्वास कायम ठेवणे, या त्रिसूत्रीवर त्यांनी कारखान्याचा कारभार चालवला, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
‘दादा गेले असले, तरी त्यांचे विचार, कार्य आणि सहकाराची शिकवण कायम आपल्याला मार्गदर्शक ठरेल,’ अशा शब्दांत राजेंद्र तावरे यांच्यासह उपस्थितांनी भावना व्यक्त केल्या.

माळेगाव (ता. बारामती) : कारखाना येथे स्वर्गीय अजित पवार यांच्या निधना निमित्ताने लोकसभेचे आयोजन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: ''..तर उद्याच शपथविधी'' सुनेत्रा पवारांचं नाव घेत छगन भुजबळांनी दिले स्पष्ट संकेत

Crime: भयंकर! अंगावर अनेक वार अन्...; विवस्त्र अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला, नेमकं काय घडलं?

Horoscope : उद्या 31 जानेवारी ठरणार 'या' पाच राशींसाठी गेमचेंजर ; नशिबाचे फासे पालटणार ! होणार नवी सुरुवात

शाहरुख खानला सिक्युरिटीने चष्मा काढायला लावल्यावर, किंग खानने केलं असं काही की... पाहा Viral Video

Body Reset Diet: डाएट आणि फिटनेसचं रुटीन वारंवार बिघडतंय का? मग शरीर डिटॉक्स करण्यासाठी ‘रिसेट डाएट’ करून पाहा

SCROLL FOR NEXT