पुणे

‘माळेगाव’कडून ११३ दिवसांत १० लाख टन ऊस गाळप

CD

माळेगाव, ता.२२ : माळेगाव (ता.बारामती) सहकारी साखर कारखान्याने सन २०२५-२०२६ च्या चालू गळीत हंगामात उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे. कारखान्याने ११३ दिवसांत १० लाख टन ऊस गाळप पूर्ण केले. कारखाना प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ११ लाख ३५ हजार ३०० क्विंटल साखर उत्पादन झाले असून सरासरी साखर उतारा ११.४५ टक्के इतका समाधानकारक मिळाला आहे.

माळेगावचे अध्यक्ष दिवंगत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या प्रगतीच्या वाटचालीला पुढे नेत कारखान्याने केवळ साखर उत्पादनातच नव्हे, तर उपपदार्थ निर्मितीतही भरीव यश संपादन केले आहे. सहवीज प्रकल्पातून सात कोटी ९१ लाख ८२ हजार ३०० युनिट वीजनिर्मिती झाली असून त्यापैकी चार कोटी ६३ लाख ३३ हजार २०० युनिट वीज निर्यात करण्यात आली आहे. कारखान्याने गेटकेन उसाच्या आधारे यंदा १२ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून मार्चअखेरपर्यंत अधिकाधिक ऊस गाळपाचे नियोजन आखण्यात आले आहे, अशी माहिती उपाध्यक्षा संगीता कोकरे यांनी दिली. यावेळी कार्यकारी संचालक अशोक पाटील यांच्यासह संचालक मंडळाने ऊस उत्पादक सभासद, ऊस तोडणी-वाहतूक कंत्राटदार तसेच अधिकारी-कर्मचारी यांचे अभिनंदन केले.
माळेगावच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे सभासद शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असले, तरी कारखान्याचे अध्यक्ष व अजित पवार यांच्या अपघाती निधनाचे दुःख अद्याप सर्वांच्या मनात ताजे आहे. या दुःखातून सावरत त्यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव रिक्त संचालक पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. महाराष्ट्र राज्याच्या सहकार क्षेत्रात अग्रगण्य संस्थांमध्ये माळेगावचा प्रथम क्रमांक राहावा, हे दिवंगत अजित पवार यांचे स्वप्न होते. त्या स्वप्नपूर्तीसाठी सुनेत्रा पवार निश्चितपणे यशस्वी ठरतील, असा विश्वास ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे व तानाजी कोकरे यांनी व्यक्त केला.

साखर उत्पादन, सहवीज निर्मिती आणि नियोजनबद्ध गळीत व्यवस्थापनाच्या बळावर माळेगाव कारखाना राज्याच्या सहकार चळवळीत आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. प्रगतीची ही घोडदौड दिवंगत नेतृत्वाला खरी आदरांजली ठरत असल्याची भावना संचालक दत्तात्रेय येळे यांच्यासह सभासद शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni Fitness: महेंद्रसिंग धोनीचं ठरलं! IPL 2026 चा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार; पण CSK संघात कोणाची जागा घेणार?

इतिहास जिवंत! गावकऱ्यांनी पुन्हा जगला शिवराय व महाराणी गुणवंताबाईंचा विवाह सोहळा, ३७० वर्षांपूर्वीचा 'तो' दिवस डोळ्यासमोर उभा!

CBSE Class 10 Result: सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; यंदा ९३.७० टक्के उत्तीर्ण, मुली पुन्हा आघाडीवर

Akola Summer Heatwave : अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? पारा पोहोचला ४४.२ अंशांवर; सकाळी १० नंतरच रस्ते ओस

Gas Cylinder Black Market : घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस; १०३ गॅस सिलिंडरसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT