पुणे

शारदानगरमध्ये कर्तृत्ववान महिलांचा गौरव

CD

माळेगाव, ता. १६ : शारदानगर (ता. बारामती) येथे जागतिक महिला दिनानिमित्त रविवारी (ता. १६) विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांचा ‘शारदा सन्मान पत्र’ देऊन गौरव करण्यात आला.
ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती संचलित कृषी विज्ञान केंद्र आणि शारदा महिला संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यंदा या उपक्रमाचे १८वे वर्ष होते. या कार्यक्रमाला राज्यातील विविध भागांतून सुमारे दोन हजार महिलांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार, कुंती पवार आणि महिलांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
यावेळी बोलताना सुनंदा पवार म्हणाल्या, ‘‘महिलांनी आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. आरोग्य विमा काढणेही तितकेच आवश्यक आहे. कॅन्सरसारख्या आजारांचे प्रमाण वाढत असून, महिलांना विविध आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील तरुणींनी पोलिस प्रशिक्षण व नर्सिंगसारखे अभ्यासक्रम करून स्वावलंबी व्हावे, यासाठी संस्थेकडून मदत केली जाईल.’’
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या सातपुते, चारुशीला कदम आणि पूजा गोवेकर यांनी केले. गार्गी दत्ता यांनी आभार मानले.

सन्मानित महिला पुढीलप्रमाणे
हेमलता किसन फडतरे (शिक्षिका, पुसेगाव-सातारा), कुसुम हरबाजी अलाम (लेखिका, गडचिरोली), उषा भास्कर शेंडगे (महिला सक्षमीकरण, सातारा), लक्ष्मीबाई शिवाजी मुटकुळे (उद्योजिका, उमराबावळे), वैजंता राजेंद्र केसकर (स्टाफ नर्स, बारामती), ॲड. डॉ. सुचित्रा घोगरे-काटकर (अध्यक्ष, बालकल्याण विभाग, सातारा), ॲड. सुप्रिया वसंत कोठारी (वकिली व्यवसाय, पुणे), प्रमिला रामभाऊ कंदीलवार (उद्योजिका व सामाजिक कार्य, अमरावती), अनुराधा राहुल काशीद (प्रगतशील शेतकरी, भोर), दीप्ती गोपाल नायर (संस्थापक, युगांतर ॲकॅडमी, पुणे), स्वाती सचिन ढोरे (महिला सक्षमीकरण कार्य, हडपसर-पुणे), राणी उमेश ननावरे (महिला सक्षमीकरण कार्य, शेळगाव-इंदापूर) आणि रेवती शिवाजी कानगुले (उद्योजिका व सामाजिक कार्य, नांदेड) यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

03159

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिवसेना-भाजपमध्ये नाराजी? एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; भाजपची तक्रार करत अमित शहांना मनातील खदखद सांगणार!

Sanju Samson 0.32s Video: संजू सॅमसनचा 'हा' Video का झालाय व्हायरल? लोकेश राहुलने हाक मारली, सुरुवातीला तो पुढे निघून गेला अन्...

Indian Army Agniveer Bharti : भारतीय लष्करात अग्निवीरांसाठी मेगा भरती; ऑनलाईन प्रक्रिया सुरु, घरबसल्या कसा अर्ज करायचा? पाहा

Latest Marathi Update: निमंत्रणावरून उपमहापौर- महापौरांमध्ये नाराजीनाट्य

कोण आहे झी मराठीच्या 'सनई चौघडे' मालिकेत दिसणारी नायिका? ५ वर्षानंतर केलंय पुनरागमन, म्हणते-

SCROLL FOR NEXT