माळेगाव, ता. १ : बारामती तालुक्यातील धुमाळवाडी, पवईमाळ आदी भागांमध्ये बुधवारी (ता. १) सायंकाळी झालेल्या पावसाने आणि भीषण गारपिटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. काही मिनिटांतच निसर्गाच्या या तडाख्याने उभ्या पिकांची अक्षरशः माती झाली.
केळी, आंबा, ऊस, चारा पिके तसेच पालेभाज्या यांसारखी हातातोंडाशी आलेली पिके जमीनदोस्त झाली आहेत. गारांच्या माऱ्याने झाडांची पाने गळून पडली, तर फळबागांचेही मोठे नुकसान झाले. शिवारात उभे असलेले हिरवेगार पीक क्षणात सपाट झाल्याचे चित्र पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले. वर्षभराच्या कष्टाचे स्वप्न डोळ्यांसमोर उद्ध्वस्त होताना पाहून अनेक शेतकरी भावुक झाले. ‘हातात आलेलं पीक गेलं, आता जगायचं कसं?’ असा हंबरडा अनेकांनी फोडला. आधीच वाढत्या खर्चामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर या संकटाने आणखी घाव घातला आहे, अशी भावना निखिल धुमाळ यांनी व्यक्त केली.
दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व बारामती पंचायत समितीचे सभापती किरण तावरे यांनी प्रशासनाला तत्काळ हालचाली करण्याच्या सूचना दिल्या. प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना बाधित शिवाराचे पंचनामे करून नुकसानीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी केली असून, नुकसान भरपाईशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट केले आहे. निसर्गाच्या या अवकाळी प्रकोपामुळे बारामती तालुक्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.