पुणे

बिनविरोधसाठी प्रयत्न करणार

CD

माळेगाव, ता. ४ : ‘‘बारामती विधानसभा पोटनिवडणूक पुर्णतः भावनिक आहे. अजितदादांचे अकाली निधन झाले. अद्याप बारामतीकर दुःखातून सावरले नाहीत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध व्हावी, हे पवारसाहेबांपासून सर्वांना वाटते. काँग्रेस पक्षाकडून बारामतीत उमेदवारी देण्याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. तरीही बिनविरोधसाठी आम्ही विविध पक्षांच्या नेते मंडळींना विनंती करणार आहे. परंतु, जर निवडणूक झालीच, तर बारामतीकर नक्कीच अजितदादादांचे कार्य डोळ्यासमोर ठेवून आमच्या पाठीशी उभे राहतील,’’ असा विश्वास राष्ट्रवादी काॅंग्रेसचे युवा नेते जय अजित पवार यांनी व्यक्त केला.
बारामतीमधील पणदरे पंचक्रोशीमध्ये बुधवारी (ता. १) गारपीट झाली. येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शिवारात शनिवारी जय पवार यांनी भेटी दिल्या. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ‘ऊस, केळी, डाळिंब, कलिंगड, गहू आदी चारा पिकांचे गारपिटीने नुकसान झाले. त्या नुकसान रकमेच्या तुलनेत शासनाकडून मदत व्हावी,’ अशी मागणी गणेश मुळीक, रोहन जगताप, संजय जगताप आदी बाधित शेतकऱ्यांनी केली. यावर जय पवार म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार आणि पवार कुटुंबीय आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शिवारातील पिकांचे पंचनामे करण्यास प्रशासनाला सांगितले आहेत. त्यानुसार पंचनाम्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. नुकसानीच्या तुलनेत आर्थिक मदत अधिकची होण्याबाबत वहिनीसाहेब, कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे, पुण्याचे आयुक्त आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेण्याचे मी नियोजन करीत आहे.’’

अजितदादा आपल्यातून जाणे आणि निवडणुकीचा हा प्रसंग आपल्या पुढे येईल, हे कोणालाच वाटत नव्हते. परंतु, दुर्दैवाने या प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे. सोमवारी सुनेत्रावहिनींचा अर्ज भरला जाणार आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आदी नेतेमंडळी अर्ज भरण्यासाठी येणार आहेत. त्याच बरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदींनाही निमंत्रित केले आहे.
- जय पवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Price Hike: इंधनाचे दर पुन्हा वाढले! बुधवारी मध्यरात्रीपासून नवीन दरवाढ लागू; पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी

SRH vs RR Eliminator IPL 2026: वैभव सूर्यवंशीने मोडले ९ विक्रम... एकाच खेळीत इतके पराक्रम... Orange Cap ही केली नावावर

Pune News : मोठी बातमी! कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सारसबाग राहणार दोन दिवस बंद

Latest Marathi News Live Update : जनगणनेला नकार देणाऱ्या ८०० कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार

Vaibhav Sooryavanshi Records: १२ षटकार, ५ चौकार! वैभवची Fastest IPL Century हुकली; २९ चेंडूंत ९७ धावांवर OUT; जयसूर्याचा विक्रम मात्र मोडला

SCROLL FOR NEXT