पुणे

माले येथील आरोग्य शिबिराला प्रतिसाद

CD

माले, ता.२८ ः मुळशी धरण परिसरातील नागरिकांसाठी टाटा पॅावर कंपनीच्या माध्यमातून
माले (ता.मुळशी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्व रोगनिदान मोफत आरोग्‍य तपासणी व उपचार शिबिर पार पडले.
मुळशी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप जठार यांच्‍या हस्‍ते शिबिराचे उद्‌घाटन झाले. जिल्‍हा नियोजन समितीचे माजी सदस्‍य अमित कंधारे, तालुका आरोग्‍य अधिकारी डॉ. वामन गेंगजे, डॉ. हेमंत दिक्षित, बालरोग तज्‍ज्ञ डॉ. रोहित काळे, स्‍त्रीरोग तज्‍ज्ञ डॉ. सृष्टी गायकवाड, आर्युवेद तज्‍ज्ञ डॉ. तुषार वैद्य, तुषार जगताप, नेत्ररोग तज्‍ज्ञ डॉ. अल्हाट यांनी रुग्णांच्या तपासणी केल्या.
दरम्यान, प्राथमिक आरोग्‍य केंद्र माले, आंबवणे यांच्‍या कार्यक्षेत्रातील माले, संभवे, वळणे, मुळशी खुर्द, वारक, ताम्हिणी, निवे या गावातील ३८७ ग्रामस्थांनी शिबिराचा लाभ घेतला. महिला व बालक यांच्‍या विविध शस्त्रक्रिया उपचार करण्‍यात येणार आहेत. मोतीबिंदू असणाऱ्या रुग्‍णांवर शस्‍त्रक्रिया, तसेच
गरजेनुसार मोफत चष्माचे वाटप रोटरीच्‍या माध्‍यमातून करणार आहे.
वैद्यकीय अधिकारी डॉ. पाराजी वायाळ यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. हौदेकर, डॉ. माधुरी शिंदे तसेच
आरोग्यकर्मचारी, ग्रामसेवक, संबंधित सरपंच, आशा स्वयंसेवक, अंगणवाडीसेविका आदींनी शिबिरासाठी परिश्रम घेतले. पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्‍य अमित कंधारे यांनी या शिबिरास भेट देऊन ग्रामस्‍थांना मिळालेल्‍या सेवा व उपचारांबद्दल उपक्रमाचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT