माले, ता. १८ : मुळशी धरणात रविवार (ता. १६) बुडालेल्या पिंपरी चिंचवडच्या थेरगाव परिसरातील दोनही युवकांचे मृतदेह चाचीवली (ता. मुळशी) गावाजवळ धरणाच्या पाण्यात सोमवारी (ता. १७) सकाळी सापडले. अनिश मनोरंजन राऊत (वय १८), विशाल रवी राठोड (वय १७, दोघेही रा. पडवळ नगर, थेरगाव), अशी त्यांची नावे आहेत.
अनिश व विशाल त्यांच्या मित्रांसह रविवारी (ता. १६) मुळशी धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ते चाचीवली-ताम्हिणी गावच्या हद्दीवरील वाघुरणेच्या ओढ्याजवळ मुळशी धरणाच्या पाण्यात उतरले. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही ते आढळले नव्हते. सोमवारी सकाळी पुन्हा शोध सुरु केला असता दोघांचे मृतदेह धरणाच्या पाणीसाठ्यात आढळून आले.
उपविभागीय पोलिस अधिकारी सुनीलकुमार पुजारी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पौडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश जाधव, पोलिस हवालदार महेश पवार, मुळशी आपत्ती व्यवस्थापनचे प्रमोद बलकवडे, निखिल शिवतरे, पोपट शिवतरे, हनुमंत नवले, समीर सुतार, रायगड आपत्ती व्यवस्थापनचे शेलारमामा, महाराष्ट्र अंडर वॉटर सर्विसेसचे ऋषिकेश शिवतरे, ज्ञानेश्वर ढोकळे यांनी मृतदेह बाहेर काढण्यासाठी सहकार्य केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.