पुणे

डोंगरवाडीत अॅसिडची वाहतूक करणारा टॅंकर उलटला

CD

माले, ता.२५ः पुणे-ताम्हिणी-कोलाड रस्‍त्‍यावर रविवार (ता.२५) सकाळी डोंगरवाडी फाटा (ता.मुळशी) येथे खचलेल्‍या रस्‍त्‍यावर महाडवरून पुण्‍याकडे जाणारा हायड्रोक्‍लोरिक अॅसिडची वाहतूक करणारा टॅंकर उलटला. वाहनचालकाच्‍या हाताला दुखापत झाली आहे. मात्र, टॅंकरमधील रसायनाची गळती सुरू झाली. त्‍यामुळे जवळ जाणाऱ्या
ग्रामस्‍थांच्‍या डोळ्याची आग होते व श्‍वास कोंडल्‍यासारखे होत आहे.


टॅंकर रस्‍त्‍याच्‍या कडेच्‍या खालील बाजूस उलटला. परंतु टॅंकरमधील अॅसिडच्‍या गळतीमुळे हवेसोबत वाहून रस्त्‍याने जाणाऱ्या वाहनचालकांना त्रास होत होता. घटनेची माहिती मिळताच महसूल प्रशासन, पौड पोलिस, मुळशी आपत्‍ती व्‍यवस्‍थापन समिती संस्‍था, पीएमआरडीए अग्निशमन दल बचाव पथक, रुग्‍णवाहिका स्‍थानिक ग्रामस्‍थ यांनी बचावकार्यासाठी घटनास्‍थळी धाव घेतली. सुरक्षिततेसाठी दोन्‍ही बाजूची वाहतूक काही काळ थांबवण्‍यात आली.

तहसीलदार रणजित भोसले यांनी सांगितले की, ‘महसुलचे पथक, पोलिस, इंडस्ट्रिअल सेफटी टीम, मुळशी तालुका आपत्‍ती व्‍यवस्‍थापन, बचाव पथकाचे काम युद्धदपातळीवर सुरू आहे. जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापनाला दुर्घटनेची माहिती दिली आहे. अॅसिड गळती रोखण्‍यासाठी संबंधित कंपनीचे तज्ज्ञ येत आहेत. झालेली गळती व त्‍याचे परिणाम टाळण्‍याच्‍या
उपाययोजना करण्‍यात येत आहेत. सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे.’

याबाबत पौड पोलिस ठाण्याचे वरिष्‍ठ पोलिस संतोष गिरीगोसावी यांनी माहिती दिली की, ‘डोंगरवाडी येथील दुर्घटनाग्रस्‍त टॅंकरपासून नागरीकांनी लांब राहावे, अॅसिडच्‍या संपर्कात येऊ नये. अॅसिड गळती थांबवण्‍यासाठी तसेच त्‍याचे दुष्परिणाम रोखण्‍यासाठी पोलिस, अग्निशमन दल, मुळशी आपत्‍ती बचाव समिती, आरोग्‍य विभाग यांचे तातडीचे प्रयत्‍न सुरू आहेत.’

अपघातास रस्‍त्‍याची दुरवस्‍था कारणीभूत
आदरवाडी ते डोंगरवाडी दरम्‍यान काही ठिकाणी रस्‍ता खचला आहे. तसेच रस्‍त्‍याला भेगा गेल्‍या आहेत. गेल्‍या वर्षभरापासून रस्‍त्‍याचा हा पट्टा नादुरुस्‍त आहे. वाहतूक असलेल्‍या या रस्‍त्‍याची कोणतीही दुर्घटना होण्‍यापूर्वीच दुरुस्‍ती करावी. यासाठी विविध पक्ष, राजकीय संघटना, स्‍थानिक ग्रामपंचायत यांनी वेळोवेळी मागणी केली होती. परंतु या मागण्‍यांकडे महाराष्‍ट्र राज्‍य रस्‍ते विकास महामंडळाच्‍या अधिकाऱ्यांनी साफ दुर्लक्ष केले. त्‍यामुळे संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांच्‍यामुळेच हा अपघात झाल्‍याचा आरोप ग्रामस्‍थांनी केला.


01105

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission : ‘’राजकीय पक्षांनी वेळीच आक्षेप नोंदवले नाहीत, जर असे घडले असते तर.. ‘' ; निवडणूक आयोगाने स्पष्टचं सांगितल!

Dahi Handi Festival : सरीवर सर! थरावर थर!! राज्यभरात दहीहंडीचा जल्लोष

INDIA Alliance News : 'मतचोरीच्या' विरोधात 'I.N.D.I.A' आघाडीचा 'मतदार हक्क यात्रा'द्वारे बिहारमध्ये एल्गार!

हसत खेळत असलेली बाई अशी... पुर्णा आजीच्या जाण्याचा प्रेक्षकांनाही बसला धक्का; म्हणाले- मन मानायलाच तयार नाही की...

WhatsApp: एक व्हिडिओ कॉल अन् बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या कसा होतोय लेटेस्ट फ्रॉड

SCROLL FOR NEXT