माले, ता. २० : मुळशी धरण परिसरात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. ताम्हिणी येथे मंगळवारी (ता. १९) सकाळी सात ते बुधवारी सकाळी सात या चोवीस तासांत तब्बल ५७५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर, या हंगामात आतापर्यंत ७४२८ मिलिमीटर एवढा मोठा पाऊस झाला आहे. हा गेल्या काही वर्षांतील विक्रमी पाऊस आहे. मुळशी धरण परिसरात दावडी येथे ४२८, शिरगाव येथे ४३० व आंबवणे येथे ३३८ मि.मी. पाऊस नोंदला गेला आहे.
या अतिवृष्टीमुळे मुळशी धरणाच्या पाणीसाठ्यात प्रचंड मोठी वाढ झाली आहे. मुळशी धरण ९९ टक्के भरले आहे.
धरणात सुमारे २० टीएमसी एवढा साठा झाला आहे. धरणातील पाणीसाठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विसर्ग वाढवत मुळा नदीत ३१ हजार क्यूसेक विसर्ग करण्यात येत आहे.
मुळशी धरण परिसरात मंगळवारी (ता. १९) सकाळी सात ते बुधवारी सकाळी सात या चोवीस तासांत झालेला पाऊस व कंसात या हंगामात आतापर्यंत झालेला एकूण पाऊस : ताम्हिणी- ५७५ (७४२८), दावडी- ४२८ (५६२४), शिरगाव- ४३० (५९००), आंबवणे- ३३८ (५०२५), मुळशी १६२ (३०६२), माले- १५५ (२७०१).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.