पुणे

मुळशी तालुक्‍यातील तालुकाध्‍यक्ष व आमदार यांच्‍या प्रतिक्रीया

CD

मुळशी तालुक्यातील विजय आमच्‍या ह्रदयातील अजितदादांना समर्पित आहे. उपमुख्‍यमंत्री सुनेत्रा पवार, आमदार शंकर मांडेकर यांनी आम्‍हा सर्व उमेदवारांना दिलेल्‍या उमेदवारी व मतदारांनी भरभरून दिलेल्‍या मतदानाबद्दल आम्‍ही त्‍यांचे ऋणी आहोत. पंचायत समितीवर सत्ता आणण्‍यासाठी युतीचा निर्णय वरिष्‍ठ घेतील व राष्‍ट्रवादीचा सभापती होईल.
- अंकुश मोरे, तालुकाध्‍यक्ष, राष्‍ट्रवादी कॉंग्रेस

पंचायत समिती दोन जागा आल्‍या. अजून एक जिल्‍हा परिषद आली असती, परंतु विकासकामे धनशक्‍ती पुढे कमी पडली. अपेक्षित यश मिळाले नाही. यामुळे किंचितही न थांबता जनतेच्‍या विकासासाठी कटिबद्ध आहोत. आमच्‍या नेत्‍या खासदार सुप्रिया सुळे यांच्‍याशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ.
- महादेव कोंढरे, तालुकाध्‍यक्ष, राष्‍ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष

‘अंधेरा हटेगा, सुरज निकलेगा, कमल खिलेगा’ या अटलजींच्‍या उक्‍तीप्रमाणे मुळशी तालुक्‍यात भाजपचे कमळ फुलले आहे. एक जिल्‍हा परिषद सदस्‍य, एक पंचायत समिती सदस्‍य ही जोरदार सुरवात झाली आहे. राज्‍यात, देशातील विकासाकडे पाहून जनतेने कौल दिला आहे. काही ठिकाणी नियोजन चुकले, धनशक्‍तीपुढे कमी पडलो. परंतु, भाजप विकासाच्‍या माध्‍यमातून जनतेच्‍या समस्‍या सोडवणे, हे आमच्‍यासाठी अग्रक्रमाचे राहील.
- हनुमंत चव्‍हाण, समीर मारणे, तालुकाध्‍यक्ष, भाजप

अजित दादांनी विकासासाठी दिलेल्‍या निधीरूपी ताकदीमुळे कार्यकर्त्‍यांनी संघटनेच्‍या माध्‍यमातून हे यश मिळवले आहे. जिल्‍हा परिषदेची तिसरी जागा थोडक्‍यात हुकली. मुळशी पंचायत समितीवर सत्ता स्‍थापन करण्‍यासाठी कुणाशी युती करायची याबाबत वरिष्‍ठांशी चर्चा करून निर्णय घेण्‍यात येईल. वरिष्ठ सांगतील तो निर्णय आम्हांला मान्‍य राहील.
- शंकर मांडेकर, आमदार, भोर- मुळशी- राजगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Lohgad Case : केतन अग्रवाल प्रकरणात महत्वाची अपडेट समोर, लोहगडावरील हत्येपूर्वीचा व्हिडिओ समोर; दोघेही रोमान्स करताना दिसले

Sonvi Bridge Accident in Sangameshwar : सोनवी पुलावर दोन ट्रकची धडक; एकाच मार्गिकेतून दुहेरी वाहतुकीचा फटका; महामार्गावर वाहनांच्या रांगा

Latest Marathi News Live Update : महाबळेश्वरमध्ये १५७ मिलीमीटर पावसाची नोंद

IPL 2027 Trade: हार्दिक पांड्यासाठी RR नंतर आणखी एक संघ मैदानात, कर्णधारपदाची ऑफर; मराठमोळ्या खेळाडूची 'वापरा अन् फेकून द्या' अशी होणार अवस्था

Pune Rain Update : पुण्यात रात्रभर पावसाची संततधार, अनेक भागांत साचले पाणी; वाहतूक कोंडीने पुणेकर त्रस्त, वाहनांच्या लागल्या रांगा

SCROLL FOR NEXT