पुणे

ओढ्यात मोटार कोसळल्याने युवकाचा मृत्यू

CD

माले, ता. ३ : पुणे-कोलाड रस्‍त्‍यावर पळसे (ता.मुळशी) येथील वळणावर मोटार अनियंत्रित होऊन ओढ्यात कोसळल्‍याने एका युवकाचा मृत्यू झाला. तर इतर तिघे जखमी झाले आहेत. सोमवारी (ता. २) रात्री आठच्या सुमारास हा अपघात झाला.
सुधीर बाळकृष्‍ण जाधव (वय ३२, रा. चिंचवड, पुणे) असे या अपघात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार सुधीर व त्‍याचे इतर चार मित्र कोकणात फिरण्‍यासाठी मोटारीने चिंचवड येथून निघाले होते. रात्री आठच्या सुमारास पळसे धबधब्‍याच्‍या जवळील वळणावर मोटार अनियंत्रित झाली व ओढ्यात कोसळली. यात सुधीरला जास्‍त मार लागला होता. त्‍याला व इतरांना उपचारासाठी पौड येथील ग्रामीण रुग्‍णालयात नेले असता डॉक्‍टरांनी सुधीर याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. तर इतर तिघांना पुढील उपचारांसाठी पुण्यातील ससून रुग्‍णालयात पाठवण्‍यात आले. पौड पोलिस पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT