पुणे

माले घाटात आढळली सात महिन्यांची मुलगी

CD

माले, ता. २२ : माले (ता. मुळशी) येथील घाटामध्‍ये पुणे- कोलाड रस्‍त्‍याच्‍या कडेला एका बास्केटमध्ये सात महिन्यांची मुलगी आढळून आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माले येथील हॉटेल फोर सीजनसमोर रस्त्याच्या कडेला जाळीच्या गुलाबी बास्केटमध्ये एक चिमुकली मुलगी ठेवलेली असल्याचे स्थानिक रहिवासी रेखा वाल्हेकर व समीर वाल्हेकर यांच्या मंगळवारी (ता. २१) पहाटेच्या सुमारास निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ गावातील नागरिकांच्या मदतीने याबाबतची माहिती पौड पोलिस ठाण्याला दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार महेश पवार, अनिता रवळेकर व राजकुमारी हरिश्चंद्रे यांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित मुलीला ताब्यात घेऊन तिची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर पुढील देखभालीसाठी तिला निगडी येथील आधार संस्था केंद्रात दाखल केले. या मुलीबाबत काही माहिती असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन पौड पोलिसांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: पाकिस्तानमध्ये रद्दीच्या भावात विकल्या जात आहेत इराणी नोटा; अनेकांनी केली साठेबाजी

कसोटी क्रिकेटला सीरियसली घ्या ! Jasprit Bumrah ला मिळालीय सूचना, गौतम गंभीर संतापलाय; BCCI म्हणतेय...

काय? चक्क शाहरुख खानचा मुलगा आर्यनने चोरला बूट, सोशल मीडियावर धक्काबुक्कीचा Viral Video

आमची बाळंतपणं करून आई परत गेली आणि काहीच दिवसात बाबांना... मधुराणीने सांगितला कठीण काळ, म्हणाली- 'मुलींना त्रास नको म्हणून...'

नशीबवान मालिकेनंतर आदिनाथ कोठारेचा नवा प्रोजेक्ट ! साकारणार डिटेक्टिव्हची भूमिका

SCROLL FOR NEXT