पुणे

शिक्षक लोकशाही आघाडीच्या अध्यक्षपदी डोंगरे

CD

मांजरी खुर्द, ता. ८ : हवेली तालुका शिक्षक लोकशाही आघाडीच्या अध्यक्षपदी तुकाराम डोंगरे, उपाध्यक्षपदी चेतन उशिरे तर सचिवपदी सतीश केंकार यांची निवड झाली आहे. के. के. घुले विद्यालयाच्या सभागृहामध्ये हवेली तालुका शिक्षक लोकशाही आघाडी माध्यमिक शिक्षक संघ व महिला शिक्षक आघाडी कार्यकारिणी निवड सभा झाली. त्यावेळी या निवडी करण्यात आल्या.
हवेली तालुका माध्यमिक शिक्षण संघटनेच्या अध्यक्षपदी दिलीप थोपटे तर शिक्षक संघटनेच्या सचिवपदी भाऊसाहेब महाडीक यांचीही यावेळी बिनविरोध निवड झाली. जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीचे कार्याध्यक्ष तानाजी झेंडे, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राम प्रभू पेटकर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष अशोक नाळे यांच्या अध्यक्षतेखाली हवेली तालुका माध्यमिक शिक्षक संघाची कार्यकारिणी निवडण्यात आली.

हवेली तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी पुरोगामी माध्यमिक विद्यालय नायगाव येथील शिक्षक दिलीप थोपटे, हवेली तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेच्या सचिवपदी एंजल हायस्कूल ज्युनिअर कॉलेजचे क्रीडा विभाग प्रमुख भाऊसाहेब महाडीक यांचे तर संत यादव माध्यमिक विद्यालय शिंदवणे येथील सहशिक्षक रमेश विचारे यांची कार्याध्यक्षपदी निवड झाली आहे.
हवेली तालुका महिला शिक्षक संघाच्या अध्यक्षपदी सुनीता राऊत, सचिवपदी वंदना चौधरी उपाध्यक्षपदी कल्पना जाधव - भिंगारदिवे, खजिनदार ऊर्मिला चव्हाण, कार्याध्यक्षपदी सविता ताकवले यांची तर, सहसचिवपदी प्राजक्ता निकम यांची निवड झाली. हवेली तालुका सेवानिवृत्त शिक्षक संघाचे अध्यक्षपदी मधुकर खरात, सचिवपदी दिलीप नेवसे, कार्याध्यक्षपदी महादेव पाटील यांची निवड झाली आहे. शरद चौधरी व पांडुरंग पवार यांनी संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: ४१ वर्षांनंतर निकाल... सर्वोच्च न्यायालयाने ठरवले दोषी पण तुरुंगवासाची शिक्षा माफ, काय होता १९८५ मधील खटला?

धाडस केलं आणि टोकं अमाऊंट भरूनच टाकली... मराठमोळ्या इन्फ्ल्युएन्सरने मुंबईत घेतलं स्वतःचं घर; शेअर केले फोटो

Latest Marathi News Live Update : मुंबईत प्रभाग समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात

Trimbakeshwar Temple Assault : भाविकाने ड्रग्ज घेतले हे ठरविणारे तुम्ही कोण? त्र्यंबकेश्वर मारहाणीवर मंत्री गिरीश महाजन संतप्त; नेमका काय प्रकार?

बापरे! सेक्रेड गेम्स फेम राजश्री देशपांडेला ब्रेस्ट कॅन्सचं निदान, सर्जरी सुद्धा झाली, म्हणाली...'लवकर कळालं पण...'

SCROLL FOR NEXT