पुणे

मांजरीतील बनावट ग्रामसभा प्रकरणी न्यायालयाने फेटाळला जामीन

CD

मांजरी खुर्द, ता. १ : येथील बनावट ग्रामसभा प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आरोपींनी जामीन मिळण्यासाठी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाकडे अर्ज केला होता. न्यायालयाने हा जामीन अर्ज फेटाळला आहे.
मांजरी खुर्द (ता. हवेली) ग्रामपंचायतीमध्ये बोगस व बनावट ग्रामसभा दाखवून एका संस्थेची मिळकत, तसेच एक हेक्टर सरकारी गावठाण जमीन बळकावल्याप्रकरणी संदीप उंद्रे यांनी उच्च न्यायालयाकडे तक्रार केली होती. न्यायालयाने त्याची दखल घेत या प्रकरणातील एकूण नऊ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या गुन्ह्यातील मुख्य आरोपी रोहिदास दामोदर उंद्रे यांच्यासह इतरांनी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. हा जामीन अर्ज फेटाळण्याबाबत वाघोली पोलिस ठाण्याच्या वतीने सरकारी वकिलांनी युक्तिवाद
केला होता. आरोपी तसेच, सरकारी पक्षाचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपी रोहिदास दामोदर उंद्रे, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी रामदास शिवराम उंद्रे व विठ्ठल सुभाष सावंत यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
आरोपी यांच्या विरुद्धच्या आरोपांकडे पाहता, त्यांची भूमिका प्रथमदर्शनी मोठी आणि गंभीर दिसते. त्यामुळे तपशीलवार चौकशी करण्यासाठी त्यांची कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याचे सांगत जामीन अर्ज फेटाळला.
सत्ता, पैसा व राजकीय दबाव निर्माण करून घोटाळे करणाऱ्या पुढाऱ्यांना कायद्याची जरब बसणे आवश्यक होते. सत्र न्यायालयाने अत्यंत महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवून आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. पोलिसांनी तत्काळ आरोपींना अटक करून न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे, अशी मागणी तक्रारदार उंद्रे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rehan Vadra vs Bikaner House Censorship : बिकानेर हाऊस प्रशासन आणि रेहान वाड्रा यांच्यात वाद; आंदोलनाची ७० हून अधिक छायाचित्रे हटवल्याने संताप

Water Tanker : पाणी टँकरची लूट थांबणार; पुणेकरांसाठी महापालिकेचे विशेष ॲप लवकरच सुरू होणार

Pune Grand Tour Competition : पुण्यात ७५ किलोमीटर लांबीचे नवे सायकल ट्रॅक उभारणार; महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांचे निर्देश

Record Breaking ENG vs SL Match : श्रीलंकेने ४३० धावांचे लक्ष्य पार केले, इंग्लंडला हरवले! इतिहास घडला, हॅरी ब्रूकचे द्विशतक व्यर्थ

Tibet Earthquake: विनाशकारी पुरानंतर तिबेटवर मोठे संकट! भूकंपाचे जोरदार धक्के; ७ रिश्टर स्केलचे हादरे बसताच...

SCROLL FOR NEXT