मांजरी खुर्द, ता. ११ : मांजरी खुर्द ते कोलवडी (ता. हवेली) या साडेचार किलोमीटरच्या रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. बेदरकार अवजड वाहतुकीमुळे हा रस्ता प्रवाशांसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. रुंदीकरणाचे काम रखडल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशासकीय दिरंगाईमुळे अपघाताचा धोका वाढल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
रुंदीकरण गेल्या तीन-चार वर्षांपासून प्रस्तावित आहे. मात्र, भूमापन आणि मूल्यांकन सर्वेक्षणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. नगररचना योजनेतील तांत्रिक अडचणी आणि जमीन संपादनातील दिरंगाईमुळे कामाचा वेग मंदावला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साठल्याने आणि धूळ उडत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
डंपर आणि मिक्सरची बेदरकार वाहतूक रस्त्यावरून होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत शाखा अभियंता अश्विनी तोंडले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
जड वाहतुकीमुळे रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. बांधकाम विभागाने तातडीने खड्डे न बुजविल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असे पंचायत समितीच्या सदस्या सुषमा मुरकुटे यांनी सांगितले.
२४ मीटर...... मांजरी खुर्द ते कोलवडी मार्गाचे रुंदीकरण
२०० .....डंपर, मिक्सरची दररोज वाहतूक
बाधित जमीन आणि वृक्षांचा मूल्यांकन अहवाल संबंधित विभागांकडे पाठवला आहे. आठवडाभरात दुरुस्ती अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कामाला गती मिळेल.
सुनील देशपांडे, अभियंता, अतुल इंजिनिअरिंग कन्सल्टन्सी
अशी आहे सध्याची स्थिती
- खड्डे, चिखल आणि अपुरी रुंदी
- थोडा पाऊस झाला तरी रस्त्यावर साचते पाणी
- वाहनांच्या टायरखालून दगडगोटे व धूळ उडते
- बांधकाम विभागाचे रस्त्याच्या डागडुजीकडे दुर्लक्ष
00608
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.