पुणे

आंबी येथे वाळुमाफियांवर कारवाई

CD

मोरगाव/ वडगाव निंबाळकर, ता. ३० : आंबी-चांदगुडेवाडी (ता. बारामती) येथील कऱ्हा नदी पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या सहा वाळू माफियांवर सोमवारी पहाटे (ता.३०) कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून तीन ट्रॅक्टर, दोन जेसीबी व एक ट्रक असा ४७ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुणे ग्रामीण पोलिसांचे स्थानिक गुन्हे शाखा व वडगाव निंबाळकर पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले.

वाळूमाफिया मोरगाव -आंबी येथील कऱ्हा नदी पात्रात अनेक वर्षांपासून बेसुमार वाळू उपसा करत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. या वाळू माफीयावर रविवारी (ता.२९) पहाटेच्या सुमारास कारवाई करण्यात आली. यात श्‍यामराव चांदगुडे (वय ४६, रा.धरणवस्ती,चांदगुडेवाडी ता.बारामती), स्वप्नील ज्ञानेश्वर भोंडवे (वय २७, रा.आंबी खुर्द, ता.बारामती), विठ्ठल तानाजी जाधव (वय २५, रा.आंबी खुर्द, ता.बारामती), अमोल शंकर सणस (वय ४६, रा. उरूळीकांचन ता.हवेली), महादेव बाळू ढोले (वय ३८, रा. मोरगाव चैथाळवस्ती ता.बारामती), विकास बाबासाहेब चांदगुडे (वय ३५, रा.धरणवस्ती,चांदगुडेवाडी, ता.बारामती) यांच्यावर कारवाई करण्यात आली. यावेळी आणखी अनोळखी तिघेजण पळून गेले. तसेच रविवारी रात्री आंबी चांदगुडेवाडी गावचे हददीत धरणवस्ती येथे कऱ्हा नदीपात्रात बेफीकीरपणे वाळू उत्खन्न करून वाहने भरत असल्याचे निर्दशनास आले होते.
यावेळी पाच ब्रास वाळू, जेसीबी मशिन, ट्रक व टॅक्टर डंपीग ट्रॉलीसह मुद्देमाल पोलिस उपनिरिक्षक योगेश शेलार यांनी जप्त केला. अवैध वाळू उपसा आणि वाहतूकप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरिक्षक योगेश शेलार करीत आहेत.

कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान
या परिसरातील ही सर्वात मोठी कारवाई असून स्थानिक महसूल आणि पोलिस यंत्रणा यांच्या वरदहस्ताने सुरू असलेला बेसुमार वाळुउपसा आत्ता तरी बंद होईल असा विश्वास नागरिकांमधून व्यक्त होत आहे. वाळुमाफियांच्या दादागिरिमुळे तक्रार करण्यास न धजावणारे शेतकरी या कारवाईमुळे समाधानी आहेत. वाळूउपसा करणारांवर वरिष्ठ पातळीवरून अशाच कडक कारवाई व्हाव्यात अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT