purandare Lake depth will provide sustainable water esakal
पुणे

Pune News : पुरंदरे तलावाच्या खोलीकरामुळे मिळणार शाश्‍वत पाणी

पुरंदरे पाझर तलावातील गाळ उपशासाठी अमृत सरोवर अभियानांतर्गत रेल फोल फाउंडेशनने येथील गाळाचा उपसा करण्यास स्वयंस्फूर्तीने पाठपुरावा करून योग्य नियोजन

सकाळ वृत्तसेवा

मोरगाव : पुरंदरे पाझर तलाव मुर्टी, मोढवे, नावळी या गावांसाठी शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरला आहे. अमृत सरोवर अभियानांतर्गत रेलफोल फाउंडेशनच्या माध्यमातून खोलीकरण व गाळ उपशाचे काम सुरू आहे. मोढवे (ता. बारामती) येथे आत्तापर्यंत ३० हजार ब्रास गाळाचा उपसा केला आहे. यामुळे साठा वाढून शाश्‍वत पाणी उपलब्ध होणार असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

तलावाचे खोलीकरण व गाळ काढण्याचे काम २८ फेब्रुवारी २०२३ पासून सुरू आहे. आजपर्यंत ७५०० टिपर गाळाची माती अनेक शेतकऱ्यांनी शेतामध्ये टाकली आहे. गाळउपसा पाऊस पडेपर्यंत सुरूच राहणार आहे. उपशामुळे पाणीसाठ्यात वाढ होणार आहे.

भविष्यात तलाव भरल्यानंतर मुर्टी, मोढवे, मोराळवाडी या गावांना चांगला फायदा होणार आहे. मुर्टी, मोढवे, नावळी या गावांच्या पाणीपुरवठा विहिरी अवलंबून आहेत. बारामतीच्या जिरायती भागातील मोरेवाडी, उंबरवाडी याशिवाय पुरंदर तालुक्यातील नावळी या गावासाठी अनेक वर्षांपासून पुरंदरे पाझर तलाव उपयुक्त ठरला आहे. या तलावाच्या बाजूला असलेल्या विहिरी तसेच जलस्रोत बळकट होणार आहेत.

मुर्टी, मोढवे ग्रामपंचायतच्या विशेष पाठपुराव्यामुळे पुरंदरे पाझर तलावातील गाळ काढण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला. तलावातील गाळरूपी काळी माती चोपन पडीक क्षेत्रात टाकल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढून, ती जमीन लागवडीखाली येण्यास भरीव मदत होणार आहे. याशिवाय तलावाच्या बाजूलाच पाणीपुरवठा विहिरी असल्यामुळे पावसाळ्यात तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर जलस्रोत बळकटीकरण होणार आहेत.

रेल फोन फाउंडेशनबद्दल कृतज्ञता
पुरंदरे पाझर तलावातील गाळ उपशासाठी अमृत सरोवर अभियानांतर्गत रेल फोल फाउंडेशनने येथील गाळाचा उपसा करण्यास स्वयंस्फूर्तीने पाठपुरावा करून योग्य नियोजन केले. याबद्दल फाउंडेशनच्या उपक्रमाविषयी आम्ही शेतकरी मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो, अशी भावना मुर्टीचे उपसरपंच किरण जगदाळे मोढवेच्या सरपंच शीतल मोरे यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT