पुणे

सुपर ट्रेकर्स ग्रुपच्या युवकांकडून लोणी भापकर येथे वृक्षारोपण

CD

मोरगाव, ता. ९ : लोणी भापकर (ता.बारामती) येथील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या युवकांनी मिळून सुपर ट्रेकर्स ग्रुप सुरू केला आहे. या ग्रुपने मैत्री दिनाचे औचित्य साधून रविवारी (ता.६) प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ आठ ते दहा फूट उंचीच्या रोपांची लागवड केली.
पर्यावरण पूरक काम करण्याचा तसेच वाढदिवसावरील अनावश्यक खर्च टाळून वृक्षारोपण करण्याची चळवळ ग्रुपने राबविली आहे. ''गड किल्ले पर्यावरण संवर्धनम''हे ब्रीद वाक्य घेऊन सुपर ट्रेकर्स ग्रुप काम करत असून, यापूर्वी रायरेश्वर, राजगड, तोरणा, विचित्रगड, रायगड अशा पाच किल्ल्यांवर ग्रुपच्या सदस्यांनी
स्वच्छता मोहीम राबविली आहे. दरम्यान, लोणी भापकर येथील प्राथमिक शाळेच्या आवारात पावसाळ्यामुळे वाढलेले गवत काढले व विद्यार्थ्यांना होणारा डासांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गवतावर तणनाशकाची फवारणी केली. यापुढील काळातही कमी तिथे आम्ही या भूमिकेतून गावामध्ये गरज असलेली कामे ग्रुपच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती सुपर ट्रेकर्स ग्रुप कडून देण्यात आले.
वृक्षारोपण केलेल्या ठिकाणी वृक्ष संवर्धनाचे नियोजनही ग्रुपकडून करण्यात येत आहे.
60290

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा थाटात पार पडला विवाहसोहळा! नवरा आहे राष्ट्रीय पुरस्कार विजेता

Mahatma Phule Jan Arogya Yojana: गरजू रुग्णांना मोठा दिलासा; महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून २३९९ प्रकारच्‍या आजारांवर उपचार

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील उत्तम नगर येथील आरोपीचे घर बुलडोझरने पाडण्यात येणार

Gujarat Crime: प्रसिद्ध मंदिराच्या बाथरूममध्ये दोन विद्यार्थिनी आढलल्या मृतावस्थेत ; ChatGPT ला विचारली जीवन संपवण्याची पद्धत

India Fuel Prices Stable : मोठी दिलासादायक बातमी ! पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार नाहीत, होर्मुझ सामुद्रधुनीतून पहिली तेल खेप रवाना

SCROLL FOR NEXT