पुणे

टंचाईग्रस्त जोगवडीतील समस्यांची सोमेश्‍वरच्या संचालकांकडून पाहणी

CD

मोरगाव, ता.२८ : जोगवडी (ता.बारामती) या टंचाईग्रस्त गावात नुकताच सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक राजवर्धन शिंदे यांनी भेट दिली. येथील पाण्याची परिस्थिती, तोडणीला आलेल्या उसाची सद्यस्थिती तसेच विविध समस्यांची पाहणी केली.
जोगवडी येथील मोडकळीस आलेल्या भैरवनाथ मंदिराला भेट देत मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच दुष्काळ जाहीर झालेल्या गावांतून लवकर ऊसतोड केली जाईल, अशी ग्वाही शेतकऱ्यांना दिली. वास्तविक, सोमेश्वर साखर कारखान्याचे कार्यक्षेत्रजवळ असल्यामुळे मोरगाव, मुर्टी, जोगवडी, आंबी यासह या भागामधील असंख्य शेतकऱ्यांनी उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले आहे. मात्र, पावसाने दिलेल्या ओढीमुळे विहिरींच्या पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे मोठ्या काटकसरीने आणलेले उसाचे पीक अडचणीत आले असून, पुढील पाणी उसाला न मिळाल्यास चांगला आलेला ऊस वाळून जाऊन वजनात घट होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे कारखान्याने टंचाईग्रस्त परिस्थितीच्या पाहणीचा विचार करून तोडणीला आलेला ऊस वेळेमध्ये तोडून घ्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. या मागणीचा विचार करून कारखान्याचे शिंदे यांनी जोगवडीसह या परिसरातील टंचाईग्रस्त गावांची पाहणी केली व टंचाईग्रस्त ठिकाणचे लवकरच नेण्याचे प्रयत्न राहतील, असे यावेळी शिंदे यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या ऊस उत्पादक शेतकरी सुनील राजे भोसले व इतर शेतकरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway : कोकणवासीयांचा जीव टांगणीला! मंत्री गडकरींनी दिलेली डेडलाईन संपणार; मुंबई-गोवा हायवे पूर्ण होण्यासाठी अजून किती महिने वाट पाहावी लागणार?

ना शुभमन गिल, ना सूर्यकुमार... Asian Games साठीच्या संभाव्य भारतीय संघाच्या यादीतून नावं गायब; जाणून घ्या कारण

आता काकूंची जिरणार! स्वानंदीसमोर येणार चिंगी गरोदर असल्याचं सत्य; ऐन लग्नात राजवाडेंच्या सुनेचा रुद्रावतार

Abhishek Banerjee Attacked : पश्चिम बंगालमध्ये खळबळ! TMC खासदार अभिषेक बॅनर्जींवर थेट जमावाकडून हल्ला; 'चोर चोर'च्या घोषणा देत बेदम मारहाण, अंडी-दगडंही फेकली

Mumbai Crime: पुण्यातील विषारी दारुचे धागेदोरे भिवंडीत, तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT