पुणे

बारामती तालुक्यात यात्रा, उत्सवांची जय्यत तयारी

CD

मोरगाव, ता. ११ : बारामती तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात मुर्टी, तरडोली, मोरगाव या गावांच्या ग्रामदैवतांचा यात्रा उत्सव १४ ते १७ मे या कालावधीत होणार आहे. परंपरेप्रमाणे येथील यात्रा श्रद्धापूर्वक करण्याची प्रत्येक गावच्या यात्रा कमिटीने जय्यत तयारी केली आहे.
वास्तविक एकीकडे दुष्काळ सदृश परिस्थिती तर दुसरीकडे बारामती लोकसभा निवडणूक प्रक्रियेतील आचारसंहिता या दोन्हीमुळे यात्रा उत्सवातील अनेक घटकांवर बंधन येणार आहेत. मात्र ग्रामदैवतांचा यात्रा उत्सव हा प्रत्येक गावाच्या मानाचा आणि श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे तिन्ही गावांमधून यात्रेचा उत्सव विधिवत परंपरेप्रमाणे साजरा करण्याचे नियोजन केले आहे. सुपा, वडगाव पोलिस ठाण्याकडून यात्रा उत्सवासाठी रीतसर परवानगी घेण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारच्या नियमांचे उल्लंघन न करता व सार्वजनिक शांतता भंग होईल असे उपक्रम, कृत्य न करता ठराविक वेळेत यात्रा उत्सव साजरा करण्यास पोलिस ठाण्याकडून परवानगी देण्यात आली आहे. मंगळवारी (ता. १४) मुर्टी येथे श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त सायंकाळी सातच्या सुमारास हळदीचा कार्यक्रम होणार आहे. बुधवारी (ता. १५) श्री भैरवनाथाचा विवाह सोहळा सायंकाळी सातच्या सुमारास होणार आहे. गुरुवारी (ता. १६) कुस्त्यांचा आखाडा दुपारी चार वाजता तर सायंकाळी सात वाजता लोकनाट्य कार्यक्रम असे नियोजन करण्यात आले आहे. तरडोली येथे १५ मे रोजी सकाळी दहा वाजता मानाची काठी उभारणे आणि त्याची विधिवत पूजा करणे असा कार्यक्रम होणार आहे. दुपारी बारा वाजता वडाचा मळा येथील भैरवनाथाचा विवाह सोहळा होणार आहे. त्यानंतर यात्रा उत्सव समितीने आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यती होणार आहेत. सायंकाळी सात वाजता तरडोलीमध्ये भैरवनाथाचा विवाह सोहळा, देवाच्या छबिना पालखी सोहळ्याची मिरवणूक असा कार्यक्रम होणार आहे. १६ (ता. गुरुवारी) सकाळी दहा वाजता लोकनाट्य कार्यक्रम दुपारी चार वाजता कुस्त्यांचा आखाडा आणि सायंकाळी सात वाजता लोकनाट्य कार्यक्रम होणार आहेत. मोरगावमध्ये श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त परंपरेनुसार चालत आलेले देवाचा विवाह सोहळा श्री भैरवनाथाचा विवाह सोहळा देवाचा छबीना पालखी सोहळ्याची मिरवणूक व लोकनाट्य कार्यक्रम होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganesh Visarjan 2026 : कसबा ते दगडूशेठ... पुण्यात आज गणरायाला निरोप; विसर्जन मिरवणुकीसाठी जय्यत तयारी

आजचे पंचांग 25 सप्टेंबर 2026! अनंत चतुर्दशी, गणपती विसर्जन; जाणून घ्या राहुकाळ आणि शुभ मुहूर्त

आजचे राशिभविष्य - 25 सप्टेंबर 2026

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 25 सप्टेंबर 2026

Hotel Gas Leakage : हॉटेलच्या किचनमध्ये गॅस गळती; सिलेंडरने घेतला पेट, कोंढवा बुद्रुकमधील घटनेत दोन कामगार जखमी

SCROLL FOR NEXT