पुणे

यात्राकाळात दारूचे व्यवसाय बंद ठेवण्याची मागणी

CD

मोरगाव, ता. ११ : बारामती तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात सध्या यात्रा उत्सवांचा हंगाम सुरू असून या निमित्ताने ग्रामदैवतांच्या दर्शनासाठी नागरिकांबरोबर बाहेरगावावरून येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असते. यात्रा काळात भाविकांना कोणत्याही प्रकारचा उपद्रव होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनाने दारूचे व्यवसाय पूर्णपणे बंद करावेत, तसेच अवैध मार्गाने दारूची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
मोरगाव तीर्थक्षेत्र असूनही येथे अनेक वर्षांपासून दारूचा व्यवसाय सुरू आहे. पोलिस प्रशासनाकडून सतत कारवाई होत असूनही येथे अवैध मार्गाने दारूची विक्री सुरू असते. मुख्य चौकाच्या बाजूने हा व्यवसाय असल्याने मोरगावच्या आजूबाजूस मद्यप्रेमी मोरगावमध्ये गर्दी करतात. अनेक वेळा हे मद्यपी रस्त्याच्या बाजूला मद्यधुंद अवस्थेत दिवसभर झोपून राहतात. याचा नाहक त्रास महिला, नागरिक आणि प्रवाशांना सहन करावा लागतो. याशिवाय लोणी भापकर, पळशी, मुर्टी येथेही अवैध मार्गाने दारू विक्री होते. यात्रा काळात मद्यपींचा येणाऱ्या भाविकांना नाहक त्रास होऊ शकतो. त्यामुळे कार्यक्रमांना गालबोट लागू शकते. ज्या ठिकाणी बेकायदा मार्गाने दारूची विक्री होते त्या ठिकाणी सुपा आणि वडगाव पोलिस ठाण्याने कारवाई करून यात्रा काळात हे दारूचे व्यवसाय शंभर टक्के बंद राहतील असे नियोजन करावे. अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. यात्रा काळातील कुस्त्यांचा आखाडा याबरोबरच बैलगाडा शर्यत आणि लोकनाट्य कार्यक्रमांना यापूर्वी मद्यपींमुळे गालबोट लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे यात्रा काळातील अनुचित प्रकार टाळण्यासाठी दारूची विक्री पूर्णपणे बंद असणे गरजेचे आहे.

अवैध दारू विक्री करणाऱ्या श्रद्धा मदने, विकास मदने या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त केला आहे. अवैध दारूचा व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार आहे.
नागनाथ पाटील, सहाय्यक निरीक्षक, सुपा
सचिन काळे, पोलिस निरीक्षक, वडगाव निंबाळकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Series: अजित आगरकर OUT, न्यूझीलंड दौऱ्यासाठी रोहित शर्माचा खास 'माणूस' निवडणार संघ; मीटिंग कधी होणार?

'दृश्यम ३' मध्ये गायतोंडेची दहशत दिसलीच नाही' म्हणणाऱ्या मराठी अभिनेत्याला नेटकऱ्यांनी सुनावलं; म्हणाले- तुम्ही लोक

Navi Mumbai: नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद, सात विभागांवर परिणाम; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Dapoli Projects,: तीन प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा; दाभोळ अणुऊर्जा, चिखलगाव बॉक्साइट व देवके नवेनगर प्रकल्प रद्द करण्याची मागणी!

Latest Marathi News Live Update : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील पुण्याच्या दिशेने रवाना

SCROLL FOR NEXT