मोरगाव, ता. ४ : बारामती तालुक्यातील मासाळवाडी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील श्रीक्षेत्र नायकोबा मंदिर हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र, मंदिर परिसरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची कोणतेच नियोजन नाही. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे. त्यामुळे येथे येणारे भाविकांच्या आरोग्य धोका निर्माण झाला आहे.
राज्याच्या वेगवेगळ्या भागातून जागृत देवस्थान म्हणून येथे भाविक दर्शनासाठी येतात. नवस बोलण्यासाठी व फेडण्यासाठी येथे भाविकांची सतत गर्दी असते. नायकोबा तीर्थक्षेत्र प्रसिद्ध असूनही येथे भाविकांची सतत वर्दळ असूनही मंदिर परिसरामध्ये पाण्याच्या बाटल्या प्लास्टिक कचरा, प्लास्टिक कॅरिबॅग, नारळाच्या शेंड्या असा कचरा साचला आहे. याचे व्यवस्थापनाचे मंदिराचे पुजारी व ग्रामपंचायत यांच्याकडून केले नाही. त्यामुळे येथे कायम कचरा पसरलेले असतो. मात्र, कचऱ्याच्या तुलनेत या ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची नियमित ठोस व्यवस्था असणे गरजेचे आहे.
सध्या या परिसरात डेंगी आणि चिकुनगुनिया रोगाची साथ आहे. कचऱ्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन त्याचा प्रसार संपूर्ण गावात व परिसरात होऊ शकतो. त्यामुळे ग्रामपंचायतीने योग्य ते नियोजन करून कायमस्वरूपी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी येथे येणाऱ्या भाविकांमधून होत आहे. दिवाळीनंतर येथे मोठी यात्रा भरते, या यात्रेसाठी सलग तीन दिवस मोठा यात्रा उत्सव साजरा केला जातो. यावेळी राज्याच्या वेगवेगळ्या भागातून भाविकांची मोठी गर्दी असते. प्रसिद्ध देवस्थान असूनही येथे येणाऱ्या भाविकांसाठी सोयी सुविधा व स्वच्छतांची व्यवस्था नसल्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांची गैरसोय होते. कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावणे, अशी मागणी भाविकांनी आहे.
यासंदर्भात मासाळवाडी ग्रामपंचायतचे सरपंच मुरलीधर ठोंबरे म्हणाले, ‘‘नायकोबा तीर्थक्षेत्र आमच्या ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रामध्ये येते. मात्र, अद्याप या ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था केली नव्हती. मात्र, खरोखरच कचऱ्याचा प्रश्न गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे येथील साफसफाई स्वच्छता व कचऱ्याची विल्हेवाट याची व्यवस्था निश्चित केली जाईल.’’
मासाळवाडी (ता. बारामती) : मंदिर परिसरात साचलेला कचरा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.