मोरगाव, ता. १२ : मोरगाव (ता. बारामती) येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयाअंतर्गत चार लाख ७५ हजार रुपये वीज बिलाची थकबाकी असून, ग्राहकांनी सुरळीत विद्युत पुरवठ्यासाठी वीजबिल नियमित भरण्याचे आवाहन विद्युत वितरण कंपनीच्या मोरगाव कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
वास्तविक, घरगुती, व्यावसायिक, पोल्ट्री, औद्योगिक अशा वेगवेगळ्या ग्राहकांना विद्युत पुरवठा होतो. मात्र काही ग्राहक नियमित वीजबिल भरतात, तर काही ग्राहकांकडून वीजबिल भरण्यास प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे थकबाकीची रक्कम वाढत जाते.
विद्युत वितरण कंपनीशी संबंधित असलेले वीजतंत्री, करार पद्धतीने काम करणारे कर्मचारी सातत्याने वीजबिल वसुलीसाठी गावातील सोशल मीडियासह वैयक्तिक थकबाकीदारांशी संपर्क करून बिल भरण्याचे आवाहन करत आहेत. मोरगाव कार्यालयाअंतर्गत मोरगाव, तरडोली, मुर्टी, मोढवे, जोगवडी, आंबी बुद्रुक, आंबी खुर्द अशा सात गावांचा समावेश आहे. सर्व प्रकारच्या ग्राहकांना नियमित व सुरळीत विद्युत पुरवठा देण्यासाठी विद्युत वितरण कंपनीकडून जिथे गरज असेल त्या ठिकाणी ती उपाययोजना केली जात आहे.
त्यामुळे ग्राहकांनीही वेळेत नियमित वीजबिल भरण्याचे आवाहन विद्युत वितरण कंपनीने केले आहे. जे ग्राहक वीजबिल भरणार नाहीत त्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला जाणार असल्याचीही माहिती शाखा अभियंता दिलीप नाळे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.