मोरगाव, ता.१२ : बारामतीच्या पश्चिम भागात सध्या खरीप हंगामामधील शेतातील कामे वेगात सुरू असून मजुरांची तीव्र टंचाई आहे. पिकास पूर्ण क्षमतेने वाढलेल्या गवताने विळखा दिला आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे.
मोरगाव, लोणी भापकर, तरडोली, जोगवडी,आंबी बुद्रुक परिसरात शेतातील कामासाठी मजूर मिळत नसल्याची परिस्थिती आहे. महिला मजुरांना २५० ते ३०० तर पुरुष मजुरांना ५०० ते ६०० रुपये रोजंदारी शेतकऱ्यांना द्यावी लागत आहे. शिवाय वेळेवर मजूर मिळत नसल्यामुळे वेळेत काम पूर्ण करताना शेतकरी कुटुंबातील महिलांना फार मोठी कसरत करावी लागत आहे.
उसाची लागण घरच्या घरी, व एकमेकांना कामात मदत करून वारंगुळा पद्धतीने शेतकरी करत आहेत. मजुरांच्या टंचाईमुळे अनेक शेतकऱ्यांना दुसऱ्या गावांमधून जास्त पैसे देऊन मजूर आणण्याची वेळ आली आहे. काही शेतकरी पिकांमध्ये पिकांच्या प्रकाराप्रमाणे तज्ञांकडून योग्य मार्गदर्शन घेऊन तणनाशक याचा वापर करण्यास प्राधान्य देत असल्याची माहिती तरडोली येथील शेतकरी राजेंद्र गाडे यांनी दिली.
तर मजूर शेतकामासाठी मिळत नसल्यामुळे दिवसाची कामाची सुरुवात लवकर करून घरच्या घरी व वारंगुळा पद्धतीने करण्यावर भर देत असल्याची माहिती तरडोली येथील शेतकरी पल्लवी भापकर रूपाली भापकर, उमा भापकर, राणी भापकर, सुरेखा गाडे, रेखा वाघ यांनी दिली.
मात्र, यावर्षी खरीप हंगामात बारामती तालुक्यात खरीप हंगामातील पेरणीचे उद्दिष्ट पूर्ण झाले असून १०७ टक्के पेरण्या झाले असल्याची माहिती बारामतीचे तालुका कृषी अधिकारी सचिन हाके यांनी दिली.
तणनाशकाचा वापर अधिक
गवतामुळे पिकांना टाकलेले खत पिकांना पूर्ण क्षमतेने उपयोगी पडत नाही. शिवाय गवतांच्या विस्तारामुळे जमिनीची प्रतवारी ढासळण्याची चिंता शेतकऱ्यांना असल्यामुळे शेत तण विरहित ठेवण्यासाठी शेतकरी कसरत करत आहेत. यामुळे काही शेतकरी मजूरटंचाईमुळे तणनाशकाचा वापर करीत आहेत.
03007
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.