पुणे

कऱ्हा नदीवरील बंधारे होणार सेमी ऑटोमॅटिक

CD

मोरगाव, ता. ३ : बारामती तालुक्याच्या पूर्वपट्ट्यात कऱ्हा नदीवरील सात बंधारे २० कोटींच्या निधीतून आता सेमी ऑटोमॅटिक होणार आहेत. त्यामुळे एका दिवसात बंधारा अडविण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे.
पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल व बारामती उपविभागाचे सहाय्यक अभियंता विजय नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली बंधाऱ्यांची कामे सुरू असल्याची माहिती बारामतीचे शाखा अभियंता शंकर चौलंग यांनी दिली. कऱ्हा काठच्या शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेशिवाय नदी व नदीवरील बंधारे यांचा शेती सिंचनास शाश्वत पाण्यासाठी मोठा नैसर्गिक आधार आहे. कमी खर्चात शेतकऱ्यांना शाश्वत पाणी शेतीसाठी उपलब्ध होते. यापूर्वी बंधाऱ्यांचे ढापे काढणे- बसविणे यासाठी एका बंधाऱ्यास १५ ते २० दिवसांचा कालावधी लागत होता. याशिवाय मनुष्यबळाची गरज जास्त असल्यामुळे त्यावर खर्चही वाढत होता. तसेच, वेळेत बंधारे अडवून झाले नाही तर पाण्याचा अपव्यय होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेमधून सेमी ऑटोमॅटिक यंत्रणा बसवून, नदीवरील बंधाऱ्यांचे काम सुरू केले आहे. फोंडवाडा ते मेडद पाटबंधारे विभागाचे १२ बंधारे असून, त्यामधील सहा बंधारे सेमी ऑटोमॅटिक यंत्रणा बसविण्यासाठी मंजूर आहेत. या सहा बंधाऱ्यांवर संबंधित विभागाने कामही सुरू केले आहे. उर्वरित सहा बंधाऱ्यांवरही ही यंत्रणा बसवावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

पावसाळ्यात नाझरे जलाशय १०० टक्के भरल्यानंतर अतिरिक्त पाणी नदीत बंधारे भरण्यासाठी सोडले जाते. सरकारी नियमानुसार १५ ऑक्टोबरनंतर बंधारे अडविण्याची तरतूद आहे. मात्र, अनेकवेळा बंधारे अडविण्यास लागणारा वेळ, मनुष्यबळ, निधीची उपलब्धता यामुळे वेळेवर बंधारे अडविले जात नाहीत. नदीपात्रातून वाहत जाणारे पाणी शेतकऱ्यांना केवळ नजरेने बघावे लागते. प्रत्यक्षात ते अडविले व साठविले जात नसल्यामुळे जलस्रोत बळकटीकरण यास फारसा फायदा होत नाही. सध्या सुरू असलेल्या कामांमुळे काम झालेल्या ठिकाणच्या यापूर्वी वर्षानुवर्षे वारंवार निर्माण होणाऱ्या समस्या सुटण्यास मदत होणार आहे.

या बंधाऱ्यासाठी निधी मंजूर
बारामती तालुक्यातील फोंडवाडा, जळगाव क.प, जळगाव सुपे, कऱ्हावागज, नेपतवळण, मेडद, गुणवडी येथील सेमी ऑटोमॅटिक बंधाऱ्यांच्या कामासाठी जवळपास २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

पाटबंधारे विभागाने अभ्यासपूर्वक व नियोजनपूर्वक सेमी ऑटोमॅटिक बंधारे ही संकल्पना राबविली असून, येत्या हंगामात शेतकऱ्यांना बंधाऱ्‍यांचा निश्चित फायदा होणार आहे. खर्च, वेळ, पाण्याचा अपव्यय यामध्ये बचत होऊन बंधाऱ्यांच्या तांत्रिकदृष्ट्या शेतकऱ्यांना उपयोगी अशा केलेल्या कामामुळे एका दिवसात बंधारा सहजतेने अडविण्यास मदत होणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर सेमी ऑटोमॅटिक बंधारे केले असून, टप्प्याटप्प्याने पुढील कामेही होणार आहेत.
- शंकर चौलंग, शाखा अभियंता, बारामती पाटबंधारे विभाग.

03169

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS 3rd T20I : अर्शदीपने सुरुवात दणक्यात करून दिली, पण सूर्याची रणनीती फसली; टीम डेव्हिड, स्टॉयनिसने वाट लावली

Crime: संतापजनक! आधी २७ दिवसांच्या बाळाला संपवलं, नंतर पत्नीकडून पतीच्या गुप्तांगावर वार, धक्कादायक कारण समोर

Hidden Camera: हॉस्टेल अन् PG रूममधील हिडन कॅमेरा कसे चेक कराल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप पद्धत

Nashik News : जगभरातील नाण्यांचा खजिना नाशिकला! डॉ. सुनीता पाठक यांची मविप्रच्या संग्रहालयाला अनमोल भेट

Nashik Municipal Election : नाशिक मनपा निवडणूक: नव्या नियमानुसार ओबीसीची एक जागा घटली; सर्वसाधारण खुल्या गटाला फायदा

SCROLL FOR NEXT