मोरगाव, ता. १४ : काऱ्हाटी येथील कृषी उद्योग मूल शिक्षण संस्थेच्या वतीने राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने बुधवारी (ता. १५) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 ते 4 या वेळेत हे शिबिर काऱ्हाटी येथील कृषी उद्योग मूल शिक्षण संस्थेच्या आवारात होणार असून परिसरातील रक्तदानास इच्छुक असणाऱ्या रक्तदात्यांनी सामाजिक बांधिलकी जपत येथे रक्तदान करण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना प्रशस्तीपत्रक व इअरबर्ड्स भेट देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली.