काऱ्हाटीत रंगला कला, कौशल्य व सृजनशीलतेचा उत्सव
मोरगाव, ता. २९ : काऱ्हाटी (ता. बारामती) येथील कृषी उद्योग मूल शिक्षण संस्थेत कला, कौशल्य व सृजनशीलतेचा उत्सव उत्साहात पार पडला. रंगांचा, शब्दांचा आणि कल्पनांच्या या अनोख्या मेळ्यात ७८४ विद्यार्थी सहभागी झाले होते. कुठे चित्रकलेच्या कागदावर उमलणारे रंगफुलांचे स्वप्न, कुठे वक्तृत्वात झंकारणारी विचारांची धार, तर कुठे कथाकथनाच्या सुरांत गुंफलेली गोष्ट तर कोठे रंगभरणातल्या कोमल रेषा आणि निबंधलेखनातील चिंतनशील मांडणी पाहून पाहुण्यांबरोबरच परीक्षकांनीही शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवर मारली.
संस्थेच्या विश्वस्त खासदार सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गुणोत्सव २०२५ या महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवात जिल्ह्यातील ८९ शाळा, महाविद्यालये व आयटीआय संस्था सहभागी झाल्या होत्या. रंगभरण, चित्रकला, वक्तृत्व, कथाकथन, भित्तीपत्रक तसेच आयटीआय जिल्हास्तरीय स्किल आदी स्पर्धा यावेळी झाल्या. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली, तर विजेत्यांना रोख बक्षिसे, सन्मानचिन्हे व प्रशस्तीपत्रके प्रदान करून गौरविण्यात आले. संस्थेचे उपाध्यक्ष दशरथ धुमाळ यांनी अध्यक्षस्थान भूषवले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या प्रसिद्ध विनोदी लेखक सु. ल. खुटवड यांनी विनोदी शैलीतून आपला प्रेरणादायी जीवनप्रवास विद्यार्थ्यांसमोर उलगडला, ज्यातून संघर्ष, चिकाटी, सातत्य व यशाचा संदेश प्रभावीपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविला. मिश्किल विनोदी शैलीतून झालेल्या विविध किस्से यातून उपस्थितांमध्ये हास्याचे फवारे उडाले. या कार्यक्रमास शेलार मेमानवाडीचे आदर्श मुख्याध्यापक अमर खेडेकर, संस्थेचे विश्वस्त प्रणव सोमण आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अधिकारी डॉ. विकास निर्मल यांनी केले. आबासाहेब कोकरे यांनी सूत्रसंचालन केले. प्राची जगताप यांनी आभार मानले.
काऱ्हाटी (ता. बारामती) : स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.