मोरगाव, ता. २९ : बारामती तालुक्यातील लोणी भापकर, मासाळवाडी, पळशी, माळवाडी लोणी, सायंबाचीवाडी, मोढवे, तरडोली या गावांमध्ये महसूल कामकाजासाठी महत्त्वपूर्ण असलेला घटक महसूल सेवक नसल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.
वास्तविक, प्रत्येक गावांमध्ये शासन सरकारने महसूल कार्यालयांचे इमारतीचे काम केले आहे. अनेक ठिकाणी एका महसूल अधिकाऱ्यांकडे एकापेक्षा जास्त गावे आहेत. त्यात मदतीसाठी अधिकृत महसूल सेवक नसल्यामुळे महसूल अधिकारी यांचीही काम करताना मोठी कसरत होत आहे. यापूर्वी अनेक वेळा मागणी करू नये महसूल सेवक रिक्तपदांसाठी नियुक्ती करण्याचा विषय मार्गी लागला नाही.
काही गावांमध्ये खासगी युवक महसूल अधिकारी यांना विविध योजना, पीक पाणी नोंद या सह विविध उपक्रम यामध्ये तात्पुरती मदत करतात. मात्र, यामध्ये सातत्य नसल्यामुळे अनेक वेळा नागरिकांची गैरसोय होते. याशिवाय अधिकृतपणे महसूल सेवक व महसूल अधिकारी असल्यानंतर त्या गावातील महसूल कार्यालयाशी संबंधित असलेले नागरिकांचे काम सहजपणे व सुरळीतपणे होण्यास मदत होते.
त्यामुळे ज्या गावांमध्ये महसूल सेवक नाही अशा गावांमध्ये बारामती महसूल विभागाने किमान भरती प्रक्रिया होईपर्यंत करार पद्धतीने महसूल सेवक नेमावा, अशी नागरिकांची मागणी आहे. महसूल अधिकारी व शेतकरी यांच्यात कामकाजात सुरळीतपणा व नियमितपणा राखण्यासाठी महसूल सेवक हा महत्त्वाचा स्थानिक पातळीवरचा दुवा आहे. मात्र, गेली अनेक वर्षांपासून ही गावे महसूल सेवकापासून वंचित आहेत.
अनेक ठिकाणी महसूल अधिकारी, नागरिकांमध्ये खडाजंगी
महसूल सेवक नसल्यामुळे कार्यालय उघडण्यापासून ते जमीन महसूल गोळा करणे, अचूक वारस नोंदी लावणे, वारस नोंदी संदर्भात वस्तुस्थितीची माहिती करून घेणे, महसूल कार्यालयातील विविध कामे करणे या अडचणी सातत्याने निर्माण होत आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी होणाऱ्या कामाचा वेग कमी राहत असल्याने अनेक ठिकाणी महसूल अधिकारी आणि नागरिक यांच्यात खडाजंगी होत आहे. महसूल सेवक नसलेल्या गावात महसूल अधिकाऱ्यांना नियमानुसार काम करताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने येथे महसूल सेवकाची नियुक्ती लवकर करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. महसूल सेवक नसलेल्या प्रत्येक गावाने बारामती तहसील कार्यालयाकडे महसूल सेवकाची मागणी केली आहे.
बारामती तालुक्यातील महसूल सेवकांच्या रिक्तपदी आरक्षण सोडत होऊन लवकरच नियुक्ती केली जाईल. यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
- स्वप्नील रावडे, तहसीलदार
3353
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.