मोरगाव, ता. ३० : मोरगाव (ता. बारामती) येथील एसटी बसस्थानकाची हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत नुकताच पाहणी करण्यात आली.
मोरगाव बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक सचिन मोरे यांनी संपूर्ण बसस्थानक परिसर दाखवून येथून प्रवाशांसाठी दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधा यांची माहिती दिली. गतवर्षीपेक्षा झालेल्या बदलाचे तपासणी अधिकारी यांनी कौतुक केले. याशिवाय नुकताच मोरगाव बसस्थानकाच्या आवाराचे काँक्रिटीकरण केले आहे. याशिवाय रंगरंगोटी व प्रसाधनगृह व्यवस्था, यामुळे येथील परिस्थितीमध्ये सुधारणा झाली आहे. पाहणी करण्यासाठी आलेले अधिकारी यांनी प्रवासी व नागरिक यांच्याशी संवाद साधून येथील वस्तुस्थितीची माहिती घेतली. तीर्थक्षेत्र असल्यामुळे येथे प्रवासी आणि भाविक यांची सतत वर्दळ असते. त्यामुळे येथे झालेल्या सुधारणेचा तपासणी अधिकारी यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी मुंबईचे विभागीय नियंत्रक अभिजित पाटील, यंत्र अभियंता स्वप्नील आहेरकर, बारामती आगाराचे वाहतूक निरीक्षक अपर्णा पवार उपस्थित होते.
03355
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.