पुणे

मुर्टी, मोरगाव, तरडोलीकरांनी अनुभवला ‘ग्रँड टूर’चा थरार

CD

मोरगाव, ता. २३ : बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात मुर्टी, मोरगाव, तरडोली येथील ग्रामस्थ, युवक, विद्यार्थी यांनी ‘पुणे ग्रँड टूरचा थरार’ अनुभवला. पारंपरिक वेशभूषा, भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवीत, शिस्त आणि उत्साह दाखवीत रस्त्याच्या दोन्ही बाजूला शिस्तबद्ध पद्धतीने उभे राहून जगभरातून आलेल्या स्पर्धकांचे त्यांनी दिमाखात स्वागत केले.
मोरगावमध्ये गुरुवारी (ता. २२) दुपारी २.३०च्या सुमारास या स्पर्धकांचे आगमन झाले. त्यापूर्वी पोलिसांचा ताफा तसेच संयोजकांची दुचाकींची स्पर्धा मार्गावर जाऊन वातावरण निर्मिती केली. मुर्टी येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तर मोरगावमध्ये श्री मयुरेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला साखळी करून, विद्यालयातील स्काऊट-गाइड पथक यांनी स्पर्धकांना मानवंदना दिली. तर विद्यार्थ्यांनी ‘भारत माता की जय’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’ या घोषणा देत वातावरणात उत्साह निर्माण केला. विद्यार्थ्यांच्या हातात वेगवेगळ्या देशांचे ध्वज होते. टाळ्या वाजवून घोषणा देत, ढोलताश्यांचा निनाद, हात वर करीत स्पर्धकांचा जोष वाढविण्याचे काम विद्यार्थी, ग्रामस्थांनी केले. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनीही ही जागतिक स्पर्धा पाहिली. गावागावातील ग्रामस्थांनी, सरकारच्या वेगवेगळ्या विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रस्त्याच्याकडेला उभे राहून स्पर्धकांना प्रोत्साहित केले. अनेकांनी मोबाइलवर हा क्षण टिपला. डोळ्याची पापणी लवते ना लवते तोच वेगाने जाणाऱ्या सायकली पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. गावोगावी महिलांनीही या स्पर्धा पाहण्यासाठी गर्दी केली होती. स्पर्धामार्गावर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या स्पर्धेची चोख तयारी म्हणून प्रशासनाच्या पूर्ण नियोजनाला ग्रामस्थांनीही सहकार्य केले. प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात अगदी शिस्तबद्ध पद्धतीने ही स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. मुर्टी व मोरगावच्या मुख्य चौकात अतिशय आकर्षक पद्धतीने सजावट करून जागतिक स्तरावरील या स्पर्धकांचे स्वागत करण्यात आले. प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळल्यामुळे या मार्गावरील संपूर्ण नियोजन दिमाखदार झाले होते.

3487

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! आठव्या वेतन आयोगानुसार किमान 'इतका' असेल पगार, आकडा आला समोर

IND vs NZ 3rd T20I : भारताने जिंकली सलग नववी ट्वेंटी-२० मालिका! अभिषेक, सूर्यकुमारच्या वादळासमोर न्यूझीलंडचा पालापाचोळा

Latest Marathi news Update : देश-विदेशातील दिवसभरातील घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर...

IND vs NZ 3rd T20I : 4,4,4,4,4,6,6,6,6 ! अभिषेक शर्माचे १४ चेंडूंत अर्धशतक; मोडला हार्दिक पांड्याचा विक्रम...

Beyond Bandish : 'बियॉंड बंदिश' कार्यक्रमात विराज जोशी यांचे 'ऑरा फार्मिंग', पहिल्याच एकल सादरीकरणात रसिकांवर गारूड

SCROLL FOR NEXT