मोरगाव, ता. १७ : सायंबाचीवाडी (ता. बारामती) येथे गेल्या अनेक वर्षांपासून १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती विविध कार्यक्रम आयोजित करून साजरी केली जाते. मात्र, यावर्षी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यामुळे बारामतीकरांवर शोककळा पसरली आहे. त्यामुळे यावर्षीची शिवजयंती तिथीनुसार ६ मार्च रोजी केवळ शिवप्रतिमेचे पूजन करून साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती शिवजयंती उत्सव समितीचे संस्थापक- अध्यक्ष प्रमोद जगताप, लालासाहेब भापकर व सचिन बोबडे यांनी दिली.
येथे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात काम करताना शिवाजी महाराजांच्या विचारांचे अनुकरण वास्तविक जीवनात येथील शिवप्रेमी करत आहेत. या पुढील काळात सामाजिक काम करताना दिवंगत अजितदादा पवार यांचा आदर्श व विचारांचे अनुकरण करत कामाची गती व विकासास प्राधान्य, असे काम येथील शिवजयंती उत्सव समितीकडून संकल्प करून केले जाणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.