मोरगाव, ता. ३ : मोरगाव (ता. बारामती) येथील कृषी उद्योग मूल शिक्षण संस्था, काऱ्हाटी संकुलाच्या वतीने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ शनिवारी (ता. २८) स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. विद्यार्थ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ स्वच्छता मोहीम राबवून इमारत व परिसर चकाचक केला. यावेळी श्रद्धांजली अर्पण करून पवार यांना अभिवादन करण्यात आले.
अनेक वर्षांपासून पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दर महिन्याच्या २२ तारखेला स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र, आता ही मोहीम दर महिन्याच्या २८ तारखेला नियमितपणे विविध ठिकाणी राबविण्याचा संस्थेच्या वतीने संकल्प केला आहे.
स्वच्छता मोहीम पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू करण्यात आली होती. परंतु त्यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या विचारांना अभिवादन म्हणून ही मोहीम अखंडपणे सुरू राहणार असल्याचे संस्थेचे सचिव प्रफुल्ल तावरे यांनी सांगितले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. विपलव बनकर,आरोग्यसेविका श्रद्धा दगडे, ज्योती चांदगुडे, साहाय्यक सविता गायकवाड, गणपत नेवसे, रूपाली पवार, पल्लवी घुले तसेच संस्थेकडून विशाल मदने, स्वप्नील काळभोर, प्रीती जाधव, अश्विनी भिसे,अनुजा हाके, किरण जाधव व अक्षय गायकवाड हे उपस्थित होते.
‘व्यक्ती जाते, पण विचार आणि कार्य कायम प्रेरणा देत राहतात’ याच भावनेने स्वच्छतेचा हा दीप पुढेही प्रज्वलित ठेवणार असल्याचे संस्थेचे कार्यकारी अधिकारी विकास निर्मळ यांनी सांगितले.
03532
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.