पुणे

रस्त्यावर पडलेले झाड हटवून तरडोली येथे वाहतूक सुरळीत

CD

​मोरगाव, ता. २८ : बारामती-जेजुरी मुख्य रस्त्यावर तरडोली (ता. बारामती) येथे झाडाला आग लागली होती. ज्यामुळे जळत असलेले झाड अचानक रस्त्यावर कोसळले. यावेळी येथून कोणीही जात नव्हते त्यामुळे दुर्घटना टळली. मात्र, वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.

​झाड पडल्याची माहिती मिळताच गौरव कदम व परेश भापकर यांनी घटनास्थळी धाव घेतली व स्थानिक आणि प्रशासनाच्या तत्परतेमुळे ​जेसीबीच्या साहाय्याने झाड दूर करण्यात आले. लखन वाघ यांनी विनामूल्य जेसीबी यंत्र उपलब्ध करून दिले. यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली. या कामात तरडोलीचे पोलिस पाटील बाळासाहेब जाधव आणि महसूल विभागाचे गाव कामगार तलाठी दिगंबर घोरपडे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून झाड हटविण्यास मदत केली.
या संकटसमयी दाखवलेल्या सामाजिक बांधीलकीबद्दल भापकर व कदम, वाघ आणि महसूल प्रशासनाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

03564

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Philippines earthquake: फिलिपिन्समध्ये ७.८ रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप! ३२ जणांचा मृत्यू, दोनशेंपेक्षा अधिक जखमी

Kalyan: कल्याणमध्ये मोठा राडा! टोळक्याकडून रिक्षाचालकाला मारहाण; घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Visakhapatnam: स्टील प्लांटमध्ये मोठा अपघात! वितळलेलं स्टील कामगारांच्या अंगावर पडलं; ८ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

IND vs AFG: भारताविरुद्ध आऊट नसतानाही अफगाणिस्तानचा खेळाडूनं सोडलं मैदान अन् मग संघसहकाऱ्यांशीस झाला वाद; नेमकं प्रकरण काय?

Strait of Hormuz: होर्मुजच्या सामुद्रधुनीजवळ जहाजावर भीषण हल्ला! २४ भारतीय नाविक संकटात; बचावासाठी टाहो

SCROLL FOR NEXT